आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie review: शॉकिंग होता \'सैराट\'चा क्लायमॅक्स, पण निराश करतो \'धडक\'चा शेवट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेटिंग 3.5/5
कलाकार जान्हवी कपूर, ईशान खट्टर, आशुतोष राणा, शालिनी कपूर
दिग्दर्शक  शशांक खेतान
निर्माता करण जोहर, हीरू जौहर, अपूर्वा मेहता
श्रेणी रोमँटिक ड्रामा
कालावधी 137 मिनिटे

 

 

तारुण्यात प्रेमाची जादू कशी चढते आणि ते समाजासोबत कसा लढा देते. अशीच 'सैराट'ची खरी कथा होती. 'धडक'मध्ये ही कथा दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला आहे. परंतू स्टार किड जान्हवीचा चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या लोकांनी जास्त अपेक्षा घेऊन जाऊ नये. ज्या लोकांनी सैराट पाहिला असेल त्यांना वाटत असेल की, धडकचा शेवटही तसाच असेल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. चित्रपटाचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट हा क्लायमॅक्स आहे, यामुळे धडक चित्रपट सैराटपेक्षा वेगळा वाटतो. 

 

'धडक'ची कथा
'धडक' हा चित्रपट मराठी चित्रपट 'सैराट'चा रिमेक आहे. चित्रपटातील जास्तीत जास्त गोष्टी सैराट प्रमाणेच आहेत. शशांक खेतानने 'धडक'मध्ये हिंदी ऑडियन्सचा विचार करुन कॉस्मॅटिक बदल केले आहेत. चित्रपटात प्रमुख भूमिकेत पार्थवी(जान्वही कपूर) आणि मधू(ईशान खट्टर) आहेत. मधुला आपल्या कॉलेजमध्ये एकत्र शिकणारी पार्थवी आवडते, तिलाही मधु आवडतो. पार्थवलीला मिळवण्यासाठी मधु खुप मेहनत करतो. कथेची विशेषता म्हणजे ही कथा उदयपुरमधील आहे. पार्थवी खुप श्रीमंत आणि पावरफुल कुटूंबातील आहे. तिचे वडील रतन सिंह (आशुतोष राणा) क्रूर आणि महत्त्वाकांक्षी नेता आहेत. तर मधु गरीब कुटूंबातून आहे. असे असूनही मधु आणि त्याचे कुटूंब पार्थवीचे मन जिंकून घेतात. दोघांची लव्ह स्टोरी सुरु होते परंतू लवकरच याविषयी पार्थवीच्या कुटूंबाला कळते यामुळे ही क्यूट लव्हस्टोरी अडचणीत अडकते. परंतू तरीही दोघं हार न मानता एकमेकांसोबत शहरसोडून पळून जातात. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या 'धडक' चित्रपटाचे संपुर्ण समिक्षण...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...