आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रिटिक रेटिंग | 3.5 /5 |
स्टार कास्ट | अक्षय कुमार, सोनम कपूर, राधिका आपटे, मृण्मयी गोडबोले, ज्योती सुभाष, अमिताभ बच्चन (स्पेशल अपिअरन्स) |
डायरेक्टर | आर. बाल्की |
प्रोड्यूसर | ट्विंकल खन्ना, क्रिअर्ज एंटरटेनमेंट, केप ऑफ गॉड फिल्म्स, होप प्रॉडक्शन्स |
संगीत | अमित त्रिवेदी |
जॉनर | बायोग्राफिकल कॉमेडी ड्रामा |
'चीनी कम' (2007), 'पा' (2009) आणि 'की अँड का' (2016) असे दर्जेदार चित्रपट साकारणाऱ्या आर बाल्की यांची नवी कलाकृती म्हणजे 'पॅडमॅन'. महिलांशी निगडीत अतिशय संवेदनशील मुद्दा मोठ्या कलात्मकतेने आणि तितक्याच प्रत्ययकारीपणे मांडण्याचा सुरेख प्रयत्न आर. बाल्की यांनी या चित्रपटातून केला आहे. एक स्ट्राँग मेसेज देणारा हा चित्रपट आहे. अक्षय कुमार, राधिका आपटे आणि सोनम कपूर यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या तामिळनाडूच्या अरुणाचलम मुरुगनाथन यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. मासिक पाळीच्या वेळी महिलांना वापरता येतील असे स्वस्त सॅनिटरी नॅपकिन बनवणा-या या अवलियाच्या संघर्षाची कहाणी या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे.
पुढे वाचा, दक्षिण भारतात नव्हे तर मध्यप्रदेशात फुलते चित्रपटाची कथा, कलाकारांचा कसा झआला आहे अभिनय आणि चित्रपट बघावा की नाही...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.