आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: रजनीकांतचे धमाकेदार कमबॅक, पुन्हा बनले गरीबांचा आधार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिटिक रेटिंग 3/ 5
स्टार कास्ट रजनीकांत, हुमा कुरैशी, इश्वरी राव, नाना पाटेकर
दिग्दर्शक पीए रंजीत
निर्माता धनुष
जोनर क्राइम ड्रामा
कालावधी 166 मिनट

 

रजनीकांत अन नाना पाटेकर या मात्तब्बर कलावंतांची जुगलबंदी असलेला ‘काला’ म्हणजे दिग्दर्शकाचा चित्रपट. पा. रणजिथ हाच चित्रपटाचा पडद्यावरील हिरो आहे. तर रजनीकांत पडद्यामागील हिरो आहे. दमदार संवाद, जबरदस्त दिग्दर्शन आणि प्रत्येक क्षणी खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच भावणारा आहे. 


मुंबईतील सुप्रसिद्ध धारावी झोपडपट्टीवर आजवर अनेक चित्रपट झाले आहेत. झोपडपट्टी मोडून त्याजागी उंच दिमाखदार इमारती उभारण्यासाठी जागा मिळवण्याचे षडयंत्र अशा अनेक कथा आजवर येऊन गेल्या आहेत. मात्र, पा रणजिथने याच गाभ्याला अतिशय नव्या आणि रंजक साच्यात घालून पेश केले आहे. 
चित्रपटातील रजनीकांतची एन्ट्री अर्थातच साऊथस्टाईल आहे. या वयातही रजनीकांत हिरोच आहे, हे त्यांच्या प्रत्येक प्रसंगात दिसून येते. दिड तासांचा चित्रपट उरकल्यावर नानाची एन्ट्री आहे. त्यातही दिग्दर्शकाने वापरलेले कौशल्य दाद देण्याजोगे आहे. कोल्हापूरी चप्पल घालून चालणाऱ्या नानांचे फक्त पायच प्रवेशात दिसतात, अन त्यातही ते भाव खाऊन जातात. दोघे तगडे अभिनेते चित्रपटात आहेत. दोघांच्या व्यक्तीरेखाही दिग्दर्शकाने तेवढयाच ताकदीने रंगवल्या आहेत. बरेचदा दमदार अभिनेत्यांपूढे इतर कलावंत झोकाळून जातात. पण चित्रपटात इश्वरी राव, अंजली पाटील आणि दीपन यांच्या भूमिकाही भाव खाऊन जाणाऱ्या आहेत. मुंबईच्या धारावीच्या पार्श्वभूमीवर फुलणारी ही कहाणी आहे. मात्र, चित्रपटावर साऊथची छाप आहे. मुंबय्या स्टाईल यामध्ये म्हणावी तशी दिसत नाही. 


करिकालाची भूमिका तगडी आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांना एकाच छताखाली सुरक्षित आयुष्य देणारा काला त्यांच्यासाठी देव आहे. तर राजकारण्याच्या वेशातील हरिदेव अभ्यंकर एक मुसद्दी राजकारणी आहे. दोघांतील दावपेच रंजक आहेत. या लढाईत कोण जिंकणार ही उत्कंठा शेवटपर्यंत बांधून ठेवणारी आहे. पा. रणजिथने वापरलेले कॅमेरा अँगल्स लक्ष वेधणारे आहेत. संवादही तगडे अन संवादफेकही दमदार आहे. हुमा कुरेशीची भूमिका म्हणजे वाळवंटातील मृगजळाप्रमाणे आहे.  रजनीकांत आणि नानाची जुगलबंदी पाहण्यासाठी नक्कीच हा चित्रपट पहावा. याशिवाय साऊथचा संपूर्ण मसाला यामध्ये आहे. एकुण काय तर चांगली कथा, उत्तम पटकथा, लक्षात राहणारे संवाद, दमदार अभिनय आणि सर्वोत्तम दिग्दर्शनाची ही मेजवानी आहे. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या चित्रपटाविषयी सविस्तर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...