आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sanju Movie Review : संजय दत्तचे 37 वर्षांचे आयुष्य हुबेहुब जगला रणबीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेटिंग   3/5
कलाकार रणबीर कपूर, दीया मिर्झा, परेश रावल, अनुष्का शर्मा, सोनम कपूर, मनीषा कोइराला, विक्की कोशल, जिम सर्भ 
दिग्दर्शक राजकुमार हिराणी
निर्माते विधु विनोद चोप्रा
श्रेणी बायोपिक
 
चित्रपटाची लांबी
161 मिनिटे
 
'संजू' चित्रपटाची कहाणी 
दिग्दर्शक राजकुमार हिराणींच्या संजू या चित्रपटाची कहाणी सुरु होते, तेव्हापासून जेव्हा संजय दत्त (रणबीर कपूर) ला पाच वर्षांची शिक्षा सुनावली जाते. तो त्याच्या आयुष्यावर पुस्तक लिहिणारी प्रसिद्ध लेखिका विनी (अनुष्का शर्मा) ला भेटतो आणि स्वतःची कहाणी सांगणे सुरु करतो.  सुनील दत्त (परेश रावल) आणि नर्गिस (मनीषा कोइराला) त्यांचा मुलगा संजूला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवण्यासाठी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतात. संजू त्याच्या आईवडिलांपासून अनेक गोष्टी लपवत असतो. याचदरम्यान नर्गिस आजारी पडतात. संजू त्याचा डेब्यू चित्रपट 'रॉकी'च्या शूटिंगला सुरुवात करतो. ड्रग्सचे व्यसन सुटावे म्हणून त्याला रिहॅब सेंटरमध्ये पाठवले जाणे, मुंबई बॉम्ब स्फोटात नाव येणे, अनेकदा तुरुंगवारी करणे, हे सर्व चित्रपटात दाखवण्यात आले आहे. याशिवाय संजूच्या आयुष्यात आणखी काय काय झाले, कशाप्रकारे त्याचा मित्र कमलेश (विक्की कौशल), पत्नी मान्यता (दीया मिर्झा) त्याच्या पाठीशी उभे राहिले,  संजय ड्रग्सच्या आहारी कसा गेला, त्याचे अनेक महिलांशी खरंच संबध होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या चित्रपटात आहेत. अडीच तासांच्या चित्रपटात संजय दत्तचे 37 वर्षांचे आयुष्य रणबीर हुबेहुब जगला आहे.
 
पुढे वाचा, कसा आहे कलाकारांचा अभिनय आणि बरेच काही..

 

बातम्या आणखी आहेत...