आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie review: नष्ट झालेल्या अपेक्षा पुन्हा जिवंत होण्याची कथा आहे \'सुरमा\', शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहतो रोमांच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिटिक रेटिंग 4/5
स्टार कास्ट दिलजीत दोसांझ, तापसी पन्नू, विजय राज, अंगद बेदी
दिग्दर्शक शाद अली
निर्माता चित्रांगदा सिंह, दीपक सिंह
जोनर बायोपिक
कालावधी 131 मिनिटे

 

बॉलिवूड : सुरमा चित्रपट पाहण्यापुर्वी तुम्ही 2007 मध्ये आलेला चके दे इंडिया पाहिला असेल, तुम्हाला वाटेल की हा चित्रपटही तसाच असेल. परंतू हे पुर्णपणे चुकीचे आहे. सूरमामध्ये चक दे इंडियाचा अंशही नाही. परंतू भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आणि त्यासाठी खेळाडूंमध्ये असलेले वेडेपण हे अंगावर रोमांच उभे करणारे आहे. सूरमामधील एंथम म्हणजेच ' पीछे मेरे अंधेरा आगे अंधी आंधी मैंने ऐसी आंधी में दिया जलाया है..' हे चित्रपटाचे टायटल पुर्ण करते. सूरमामध्ये दिलजीतने जबरदस्त अभिनय केला. यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या वेदना सर्वांना दिसल्या आहेत.


सूरमाची कथा : 'सूरमा'ची कथा ही हॉकी टीमचे माजी कर्णधार संदीप सिंह यांच्या आयुष्यावर आधारित आहे. संदीप(दिलजीत दोसांझ) हे हरियाणाच्या एका लहानशा वस्तीत राहत होते. 1994 मध्ये याला देशाची हॉकीची राजधानी म्हटले जात होते. या वस्तीतील जास्तीत जास्त लोकांचे भारतीय हॉकी टीममध्ये खेळण्याचे स्वप्न आहे. संदीपच्या डोळ्यांतही हेच स्वप्न होते. परंतू ज्यावेळी कोच त्याच्याकडून कठोर मेहनत करुन घेतो, तेव्हा त्याचे हे स्वप्न मोडायला लागते. यानंतर तो हॉकीपासून दूर जातो.

 

- काही दिवसांनंतर संदीपच्या आयुष्यात हरप्रीत(तापसी पन्नू)ची एंट्री होती. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. हरप्रीत ही संदीपला पुन्हा एकदा हॉकी खेळण्यासाठी प्रेरित करते आणि तो हॉकीला आयुष्याचा गोल बनवतो.


- ज्यावेळी संदीपला एका मॅचवरुन घरी परतताना गोळी लागते तेव्हा त्याचे आयुष्य उध्वस्त होते. यामुळे त्यांच्या कंबरेच्या खालचा भाग काम करणे बंद करतो. यानंतर संदीपने ख-या आयुष्यात आपले हॉकीचे स्वप्न आणि वर्ल्ड रिकॉर्ड कसा बनवला हे चित्रपटात पाहायला मिळेल. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा चित्रपटाचे संपुर्ण समिक्षण...
 

 

बातम्या आणखी आहेत...