आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : सच्च्या देशभक्तीचे थरारक, उत्कंठावर्धक चित्रण आहे \'AIRLIFT\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमा
एअरलिफ्ट
रेटिंग3.5/5
दिग्दर्शक
राजा कृष्ण मेनन
कलाकार
अक्षय कुमार, निमरत कौर, फेरन्या वझीर
निर्मातेनिखिल आडवाणी, मोनिशा आडवाणी, अरुणा भाटिया, मधु जी भोजवानी, कृष्ण कुमार आणि विक्रम मल्होत्रा
संगीतकार

अमाल मलिक आणि अंकित तिवारी
श्रेणी
अॅक्शन-थ्रिलर

युध्दस्य कथा रम्य.. असे म्हणतात. आधुनिक काळातील युध्दातील सत्य घटनेवर आधारित कथा असेल तर मग… अक्षय कुमारचा ताजा एअरलिफ्ट नेमका हाच अनुभव देतो. क्षणाक्षणाला वाढत जाणारी उत्कंठा, थरार आणि मातृभूमीप्रती असणारे सच्चे प्रेम यांच्यातील हा अडीच तासाचा प्रवास निव्वळ अविस्मरणीय ठरतो. ('AIRLIFT' मध्ये असे आहेत अक्षय कुमारचे लक्ष वेधणारे दमदार डायलॉग्स)
दोन दशकांपूर्वी इराकने कुवैतवर केलेला हल्ला आणि त्यात अडकलेले दीड लाखांहून जास्त भारतीय. कुवैतमधील युध्दभूमीचे चित्रण आणि भारतीयांना त्यातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी एका सच्च्या देशभक्ताने दिलेला लढा याचे थरारक चित्रण एअरलिफ्टला एका वेगळ्या उंचीवर नेते. सद्दाम हुसेन या इराकच्या हुकूमशहाने १९९० मध्ये कुवैतवर कब्जा केला. कुवैतमध्ये निव्वळ अंदाधूंदी माजली. इराकच्या फौजेने अमानुष अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्याकाळात तेथे दीड लाखांहून अधिक भारतीय होते. कुवैतचे सरकार तर केव्हाच गाशा गुंडाळून सर्वांना उघड्यावर टाकून पळून गेले. त्यावेळी एका भारतीय वंशाच्या बिल्डरने आपल्या चार-पाच साथीदारांसह सर्व भारतीयांना एकत्र आणले. सद्दामच्या उद्दाम फौजेला शह देत व भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधत या सर्व भारतीयांना कुवैतमधून बाहेर कसे काढले याचे चित्रण एअरलिफ्ट मध्ये आहे. (On-Location: रास अल-खैमा आणि राजस्थानमध्ये झाले 'एअरलिफ्ट'चे शूटिंग)
१९९० मध्ये सत्यघटनेवर आधारित ही कथा. यात नायक आहे ती परिस्थिती. क्षणाक्षणाला बदलणारी परिस्थिती व युध्दाची पार्श्वभूमी याचे थक्क करणारे चित्रण हा एअरलिफ्टचा यूएसपी. सत्यघटनेवर अनेक चित्रपट आजवर आले, मात्र त्यात नायकाला लार्झ्र दॅन..असे पेश करण्याची आपल्याकडे जणू फॅशनच आहे. एअरलिफ्टमध्ये दिग्दर्शक मेनन यांनी नेमके हेच टाळले आहे. त्यांनी सातत्याने बदलणारी परिस्थितीच कशी खरी नायक आहे हे उत्तम दर्शवले आहे. त्यामुळेच चित्रपटावरची त्याची पकड कोठोही सैल होत नाही. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत जाते, रणगाडे, हातात एके ४७ घेतलेली सोळा-सतरा वर्षांची सद्दामची उन्मत फौज, भारतीयांची मानसिकता, त्यातून आलेल्या परिस्थितीला तोंड देणारा नायक, भारतीय वकिलात व परराष्ट्र मंत्रालयातील कामकाज, याचे उत्तम व खिळवून टाकणारे चित्रण. यामुळे एअरलिफ्ट एका आगळ्या विश्वात नेतो, यात शंका नाही.
पुढे वाचा, चित्रपटाचा उर्वरित रिव्ह्यू...