आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : निरागस चिमुकली आणि साध्याभोळ्या \'बजरंगी\'ची कहाणी \'...भाईजान\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बजरंगी भाईजान' या सिनेमाच्या एका दृश्यात सलमान खान आणि हर्षाली मल्होत्रा - Divya Marathi
'बजरंगी भाईजान' या सिनेमाच्या एका दृश्यात सलमान खान आणि हर्षाली मल्होत्रा
सिनेमाचे नाव बजरंगी भाईजान
क्रिटिक रेटिंग 3.5/5
स्टार कास्ट सलमान खान, करीना कपूर खान, नवाजुद्दीन सिद्दिकी आणि हर्षाली मल्होत्रा
दिग्दर्शक कबीर खान
निर्माते सलमान खान, रॉकलाइन वेंकटेश
संगीतकार प्रीतम चक्रवर्ती, कोमल श्याम आणि जुलियस पैश्कियाम
जॉनर ड्रामा

दिग्दर्शक कबीर खान जवळजवळ चार वर्षांनी मोठ्या पडद्याकडे परतले आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेला 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाकल झाला आहे. 2012 मध्ये कबीर खान आणि सलमान खान कॉम्बिनेशन असलेला 'एक था टायगर' रिलीज झाला होता. हा सिनेमा त्यावर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता. आता ही जोडी पुन्हा एकदा बजरंगी भाईजानमधून परतली आहे. खास गोष्ट म्हणजे या सिनेमाद्वारे सलमान केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे तर निर्माता म्हणूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
जाणून घेऊया कसा आहे एकुणच हा सिनेमा...

एकेकाळी प्रेमकथा, झाडांच्या मागे धावणारे नायक नायिका, त्यातून गैरसमज, खलनायकाची कारस्थाने व त्यावर मात करत नायकाने मिळवलेला विजय, अशा एकमेव सूत्रांभोवती हिंदी चित्रपट फिरायचा. काळ बदलला. तंत्रज्ञान पुढे आले. संदर्भ बदलले, परिस्थिती बदलली. बदल हा निसर्गाचा नियम आहे. हिंदी चित्रपटही त्याला अपवाद नाही. सलमान खानचा ताजा 'बजरंगी भाईजान' असाच वेगळ्या विषयावर व नात्यावर बेतलेला आहे. धर्म, जात, पात, वर्ण, भाषा, पंथ, वर्ग या सर्वांहून श्रेष्ठ असणाऱ्या मानवतेच्या अत्यंत कणखर नात्यावर 'बजरंगी भाईजान' नेमके भाष्य करणारा आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील संदर्भाने हे नाते आणखी वेगळ्या उंचीवर जाणारे आहे. एरव्ही अंगावरचा शर्ट काढून दबंगगिरी करणारा सलमान यात नाही. मानवी भावनांच्या हिंदोळ्यावर सच्चाईने चालणारा साफ मनाचा नायकरूपी सलमान बजरंगी मध्ये दिसतो. मूळची पाकिस्तानच्या असणाऱ्या व भारतात हरवलेल्या एका निरागस मुक्या मुलीला तिच्या सिमापार राहणाऱ्या आई-वडिलांकडे पोहोचवणारा एक नायक, ही बजरंगीची मध्यवर्ती संकल्पना. यात महत्त्व आहे ते मानवतेला, माणुसकीच्या नितळ नात्याला. सलमानने यात एक कट्टर हिंदू तरुणाची भूमिका रंगवली आहे. त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून ते हनुमानाच्या भक्तीपर्यंतचे अनेक संदर्भ आहेत. जन्मापासून मुकी असणाऱ्या आपल्या मुलीला दिल्लीतल्या दर्ग्यात गेल्यास वाचा येईल या भावनेतून भारतात आलेल्या पाकिस्तानी आई-मुलीची ताटातूट होते. मुलगी भारतात तर आई पाकिस्तानात. ही मुलगी मग सलमानला भेटते. काळानुसार सर्व संदर्भ कळतात. मग सलमान
तिला सिमापार नेऊन तिच्या घरी कसा पोहोचवतो याचे चित्रण 'बजरंगी भाईजान' मध्ये आहे. यात येणाऱ्या धर्म, देश, कायदे, द्वेष, मत्सराच्या भिंती. त्यावर माणुसकीने केलेली मात याचे रंजनात्मक चित्रण यात आहे. हे सारे टिपत असतानाच भारत-पाक संबंधावर विविध रुपातून केलेले भाष्य अंजन टाकणारे आहे. भारत-पाक क्रिकेट सामने, हिंदू-मुस्लिम चाली रिती, खाण्याच्या सवयी, वेगळी संस्कृती यावरही उत्तम भाष्य करण्यात आले आहे. बजरंगीच्या पहिल्या हाफमध्ये सलमान, करीना, हर्षदा भाव खाऊन जातात. तर दुसऱ्या हाफमध्ये नवाजुद्दीन लक्ष वेधून घेतो.
पुढे वाचा, कसा आहे कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन आणि संगीत...