आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: कथा नेहमीचीच, तरीही प्रेक्षकांना गोड लागते \'बरेली की बर्फी\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
रेटिंग 3/5
कलाकार कृति सेनन, राजकुमार राव, आयुष्मान खुराना, पंकज त्रिपाठी आणि सीमा पहवा
दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी
संगीत आर्को पर्वो मुखर्जी, तनिष्क बागची, समीरा कोप्पिकर, समीर उद्दीन आणि वायु
निर्माता नितेश तिवारी, श्रेया जैन, रजत नोनिया
जॉनर रोमांटिक कॉमेडी ड्रामा
 
दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी यांचा चित्रपट 'बरेली की बर्फी' रिलीज झाला आहे. 'निल बटे सन्नाटा' (2016) नंतर अश्विनी यांचा या दुसरा चित्रपट आहे. यात त्यांनी एका लहान शहराच्या एका स्वतंत्र विचाराच्या मुलीची कथा सांगितली आहे. जाणून घ्या कसा आहे चित्रपट...
 
कथा
चित्रपटाती कथा बरेली (उत्तर प्रदेश) येथे राहणाऱ्या मिश्रा कुटुंबाच्या अवतीभोवती फिरते. नरोत्तम मिश्रा आणि सुशीला मिश्रि यांची मुलगी (बिट्टी) कृती सेनन स्वभावाने फार मनमोकळी असते. जेव्हाही मुले तिला बघायला येतात तेव्हा तिला चित्रविचित्र प्रश्न विचारतात. पुरुषवादी विचार आणि घरच्यांना होणारी चिंता यामुळे परेशान झालेली बिट्टी घरातून पळून जाते. ती पळण्यासाठी स्टेशनवर जाऊन पोहोचले तेव्हा  तिला तिथे 'बरेली की बर्फी' हे पुस्तक मिळते. या पुस्तकाचा लेखक प्रीतम विद्रोही (राजकुमार राव) असतो. तिला असे वाटते की हा लेखक फार जवळून ओळखतो तेव्हा ती घरी परतते आणि प्रीतम विद्रोहीला शोधू लागते. याकामी तिला चिराग दुबे (आयुष्मान खुराना) मदत करतो. चिराग प्रीतमला शोधतो आणि त्याला बिट्टीला प्रेमात अडकवून नंतर तिला सोडण्यास सांगतो, कारण चिरागला बिट्टी हवी असते. प्रितम विद्रोही खरच बिट्टीला ओळखत असतो?, चिरागला बिट्टी मिळते का? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी आपल्याला चित्रपट पाहावा लागेल. 
 
(शेवटच्या सेलाईडवर पाहा, चित्रपटाचे ट्रेलर)
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, कशी आहे चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय.. 
बातम्या आणखी आहेत...