आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : उत्कंठा वाढवणारा अन् खिळवून ठेवणारा \'रनिंग शादी\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिटिक रेटिंग   3/5
स्टार कास्ट अमित साध, तापसी पन्नू, अर्श बाजवा
डायरेक्टर अमित रॉय
प्रोड्यूसर   राइजिंग सन, क्राउचिंग टाइगर
संगीत अनुपम रॉय, अभिषेक-अक्षय, जेब
जॉनर  रोमँटिक कॉमेडी
 
तापसी पन्नू आणि अमित साध या नव्या जोडीचा ‘रनिंग शादी’ उत्कंठा वाढवणारा अन् खिळवून ठेवणारा आहे. बेबी आणि पिंक चित्रपटातून लक्ष वेधलेल्या तापसीचे हे रूप पाहणे एक रंजक अनुभव आहे. तर विविध चित्रपटांतून लहानशा भूमिकांतूनही दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या अमितनेही या चित्रपटात उत्तम काम केले आहे. 
 
प्रेम करणाऱ्यांना नियोजनबद्धरित्या पळून जाण्यास मदत करणाऱ्या रनिंग शादी डॉट कॉम या वेबसाईट भोवती ही प्रेमकथा गुंफण्यात आली आहे. दिग्दर्शक अमित रॉय यांनी चित्रपटाचा विषय तर चांगला निवडलाच पण उत्तम पटकथेतून त्याला मांडले देखील. रनिंग शादी....बद्दल टीव्हीवर आलेल्या बातमीत लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियांपासून चित्रपटाची सुरुवात होते. त्यामुळे अगदी पहिल्या सीनपासूनच कथेविषयीची उत्कंठा बांधली जाते, ती अगदी शेवटच्या सीनपर्यंत कायम राहते. 

अमृतसरमध्ये फुलणारी ही प्रेमकथा, हरियाणा, हिमाचलमार्गे बिहारपर्यंत जाऊन पोहचते. चित्रपटात कोणत्याही प्रसंगात अतिशयोक्ती दिसत नाही. मुद्देसुद बांधणीमुळे चित्रपट आखीव रेखीव झाला आहे. या तिन्ही प्रांतातील संस्कृतीचे दर्शनही चित्रपटात जशाला जसे घडते, हे चित्रपटाचे बलस्थान आहे. 'सुल्तान' चित्रपटात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या अमित साधने नावाप्रमाणे सादगीपुर्ण अभिनयाने चित्रपटात प्रेक्षकांना जिंकले आहे. तर पिंकसारख्या चित्रपटातून वेगळे अस्तित्त्व निर्माण करणाऱ्या तापसीनेही या चित्रपटात लावलेला जुगाड जमून आला आहे. दिग्दर्शकाने चित्रपटात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा घेतलेला निर्णय अचूक ठरला. मिळालेल्या संधीचे कलावंतांनी सोने केले आहे. मोठा स्टार नसतानाही हा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधतो, अन शेवटाला जाईपर्यंत खिळवून ठेवतो.  
 
सिनेमाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईडवर... 
बातम्या आणखी आहेत...