आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOVIE REVIEW : नुसतीच धडाडधूम, पाणी जादा अन् दूध मात्र कम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट बॉम्बे वेलवेट
रेटिंग ** अडीच स्टार
कलावंत रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, करण जोहर, के.के. मेनन,सत्यदीप मिश्रा, मनीष चौधरी
दिग्दर्शक अनुराग कश्यप
श्रेणी क्राइम ड्रामा

'गँग्ज ऑफ वासेपूर'मुळे अनुराग कश्यप हे नाव सर्वतोमुखी झाले. अनुराग क्राइम मधला मास्टर माणूस. त्याचा ताजा 'बॉम्बे वेलवेट'ही यास अपवाद नाही. सत्तरीच्या दशकातील मुंबई आणि त्यावेळचे काळे जग याभोवती हा चित्रपट फिरतो. सात बेटांपासून आताची मुंबई कशी बनली, त्यात काळे जग, बिल्डर्स आणि राजकारणी यांचा कसा हात होता हे या चित्रपटाचे मुख्य सूत्र. मात्र चार-चार पटकथाकारांनी एकत्र येऊनही हे मुख्य सूत्र भरकटले आहे. प्रेमकथा फुलवावी की काळ्या जगताचा चेहरा फोकस करावा या बाबत गोंधळ उडाल्याने 'बॉम्बे वेलवेट'ची वाट लागली आहे.
खूप अपेक्षेने भरवशाच्या हॉटेलात जावे आणि तेथे पाणी जास्त अन दूध कमी असणारी गोल्डन चहा प्यायला मिळावी तसेच काहीसे अनुराग कश्यपकडून 'बॉम्बे वेलवेट'च्या बाबत झाले आहे. पहिल्या फ्रेमपासून सुरू होणारी धडाडधम शेवटच्या फ्रेमपर्यंत आपली साथ देते, मात्र त्यात रंजनाचा गोडवा कमी होत जातो.
जॉनी बलराज हा टपोरी या चित्रपटाचा नायक. रोझी ही गायिका त्याची नायिका. कैझाद खंबाटा हा खलनायक. या तीनही व्यक्तिरेखा अनुक्रमे रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि करण जोहर यांनी पडद्यावर उभ्या केल्या आहेत. करण जोहर वगळता अनुष्का आणि रणबीरने जीव ओतून त्या साकरल्या आहेत. हा एक प्रेक्षकांसाठी दिलासा आहे. 'गँग्ज ऑफ वासेपूर'पासून अनुरागकडून अपेक्षा वाढलेल्या असताना त्याने 'बॉम्बे वेलवेट'च्या पटकथेकडे कसे दुर्लक्ष केले हे समजत नाही.

कथा :
जॉनी बलराज (रणबीर कपूर) हा गल्लीतला गुंड. बिग शॉट बनण्याची त्याची मनीषा. तो बॉक्सिंग करून पैसे मिळवत असतो. कैझाद खंबाटा (करण जोहर) याकाळ्या जगतातील बड्या प्रस्थाची नजर जॉनीला हेरते. जॉनी खंबाटाचा विश्वास संपादन करून त्याच्या 'बॉम्बे वेलवेट' कलबचा मॅनेजर बनतो. तेथे रोझी (अनुष्का शर्मा) गायिका असते. सात बेटे एकत्र करुन नवी मुंबई बनवण्याचा खंबाटाचा घाट असतो. त्यातच एका वृत्तपत्राचा संपादक जिमीला (मनीष चौधरी) याची कुणकुण लागते. त्यानेच रोझीला क्लबमध्ये पाठवलेले असते. त्यातच रोझी व जॉनी एकमेकांच्या प्रेमात पडतात. पुढे काय होते ते पडद्यावर पाहा.
दिग्दर्शन :
'गँग्ज ऑफ वासेपूर' सारखी कमाल अनुरागला 'बॉम्बे वेलवेट' मध्ये दाखवता आलेली नाही. मूळ धागा सोडून पटकथा भरकटल्याने त्याचा काहीसा गोंधळ उडाला आहे. बेटर लक नेक्स्ट टाइम.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, उर्वरित रिव्ह्यू...