Home | Reviews | Movie Review | Haseena Parkar Movie Review

Movie Review: दमदार विषय तरीही कमकुवत सादरीकरणामुळे फेल ठरला 'हसीना पारकर'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 22, 2017, 02:53 PM IST

हसीना पारकर एक बायोग्राफिकल क्राइम चित्रपट आहे, जो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमची बहीण हसीना पारकरवर बनवण्यात आला आहे.

 • Haseena Parkar Movie Review
  रेटिंग 2/5
  कलाकार श्रद्धा कपूर, सिद्धांत कपूर, अंकुर भाटिया, राजेश तैलंग, दधि पांडेय
  दिग्दर्शक अपूर्व लखिया
  संगीत सचिन-जिगर
  निर्माता नाहिद खान
  जॉनर बायोग्राफिकल क्राइम
  चित्रपटाची कथा
  चित्रपटाची कथा आहे 2007 ची. जेव्हा हसीना पारकर (श्रद्धा कपूर) कोर्टामध्ये सुनावणीसाठी येते. कोर्टामध्ये महिला वकील पिता (दधि पांडेय), पति (अंकुर भाटिया) आणि भाऊ (सिद्धांत कपूर) यांच्याविषयी सर्व माहिती देते. त्यानंतर दाऊदच्या केसचे काय होते आणि त्यानंतर काय घडते हे पाहण्यासाठी आपल्याला थिएटरमध्येच जावे लागेल. दाऊद दुबईला पळून गेल्यानंतर त्याचा सर्व कारभार त्याचा मेहुणा इब्राहीम पारकर पाहत होता. नागपाडामध्ये त्याच्या हत्येनंतर 'गॉडमदर' या नावाने फेमस असलेल्या हसीना पारकरने दाऊदचा कारभार सांभाळला होता.
  पुढच्या स्लाईडवर वाचा, कसे आहे चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संगीत, अभिनय...
 • Haseena Parkar Movie Review

  दिग्दर्शन 


  चित्रपटाचे दिग्दर्शक अपूर्व लखिया यांचे दिग्दर्शन आणि कॅमेरावर्क चांगले आहे. पण चित्रपटाची कथा आणि स्क्रिनप्ले कमजोर आहे. कथा जशीजशी पुढे वळते ती बनावटी वाटायला लाते. फटाफट अनेक घटना दाखवल्यामुळे प्रेक्षक काहीकाळ गोंधळूनही जातो. चित्रपटाच्या संवादावरही लक्ष देण्यात आले नाही त्यामुळे कधीकदी सिरीअस सीन असतानाही हसू येते. 

 • Haseena Parkar Movie Review

  अभिनय 


  श्रद्धा कपूरचे काम बनावटी वाटते. हसीना पारकरच्या रोलमध्ये ती फिट बसली नाही. तिची डायलॉग डिलीवरीतही ती कमी पडली आहे. तिच्या वडिलांच्या रोलमध्ये असलेले दधी पांडे यांनी चांगले काम केले आहे. दुसऱ्या कलाकारांनीही चांगला अभिनय केला आहे. कोर्टामध्ये वकिलाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचा आवाज कानाला त्रासदायक वाटतो. 

 • Haseena Parkar Movie Review

  संगीत 


  चित्रपटाचे बॅकग्राउंड स्कोर फार लाऊड आहे. चित्रपटात एकच गाणे आहे ज्याची काही गरज नव्हती. यामुळे चित्रपटाच्या कथेवरही परीणाम झाला आहे. संगीत सचिन-जगर यांनी दिले आहे. 

 • Haseena Parkar Movie Review

  पाहावा की नाही 


  जर तुम्ही श्रद्धा कपूरचे फॅन असाल तर हा चित्रपट तुम्ही एकदा पाहू शकता. नाहीतर टीव्हीवर येण्याची वाट पाहिली तरी चालेल.

Trending