आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Movie Review : जुने तेच सोने, अक्कल न वापरल्याने फसलेली नक्कल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमाहीरो
रेटिंग1.5/5
स्टारकास्टसूरज पंचोली, अथिया शेट्टी, आदित्य पंचोली, तिग्मांशू धुलिया, शरद केळकर, अनिता हसनंदानी
दिग्दर्शकनिखिल आडवाणी
निर्मातासलमान खान फिल्म्स प्रॉडक्शन

'लंबी जुदाई...' गाण्यातला विरही गोडवा आजच्या पिढीलाही भुलवतो, 'मै तेरा जानू हूँ...'चे माधुर्य २५ वर्षांनंतरही कायम आहे, 'प्यार करने वाले कभी डरते नही..' आजही अनेक प्रेमीयुगुलासाठी प्रेरणादायी आहे....आणि हो.. 'कैसा मोसम देखा पहिली बार...'मधली सुरेल तान आजही प्रसन्न करणारी...ही सारी आपल्या जॅकी दादा व मिनाक्षी शेषाद्रीच्या 'हीरो'ची जादू.. एवढे सर्व सांगायची गरज म्हणजे शुक्रवारी पडद्यावर झळकलेला 'हीरो' नामक चित्रपट. जून्या हीरोवरून प्रेरणा घेऊन सूरज पांचोली व अथिया शेट्टी ही नवी जोडी घेऊन बनवलेला हा ताजा हीरो... जुन्या हीरोच्या आसपासही न फिरकणारा बनला आहे. कथा-पटकथा, गीत-संगीत, संवाद, अभिनय अशा सर्व पातळीवर नवा हीरो अपेक्षाभंग कऱणारा आहे. जुने तेच सोने म्हणतात तेच खरे.
आदित्य पांचोलीचे सुपूत्र सूरज आणि सुनील शेट्टीची सुपूत्री अथिया शेट्टी यांनी या 'हीरो'द्वारे पडद्यावर पाऊल टाकले आहे. प्रेमकथा हा वर्षानुवर्षे सर्वांनाच भूरळ घालणारा विषय घेऊन ही नवी तरूण जोडी पडद्यावर आली असली तरी हा प्रयोग अनेक पातळ्यावर फसला आहे. मूळ कथा सुभाष घईंच्या कल्पनेवरून घेतली आहे. तिला आधुनिक स्वरुप देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. मात्र पटकथेत दमच नसल्याने सारे मुसळ केरात..अशी अवस्था झाली आहे. जुन्या 'हीरो'ने अनेक बेंचमार्क निर्माण करून ठेवले आहेत. कथाही तशीच असल्याने प्रेक्षक नकळत नव्याची तुलना जुन्याशी करत राहतो... अन् नवा 'हीरो' जसजसा पुढे सरकत जातो. तसे अपेक्षाभंग वाढत जातो. बरे श्रवणीय गाणी काही दिलासा देतील ही अपेक्षाही फोल ठरते. एकतर सध्या कॉपी-पेस्टचा जमाना आहे, हे मान्य केले तरी कॉपी करण्यासही अक्कल लागते. नक्कल करताना अकलेचा थोडाजरी वापर झालच्या पुरावा पडद्यावर दिसला असता तर मायबाप प्रेक्षकांना दिलासा मिळाला असता. मात्र दिग्दर्शकाने तीही सोय ठेवली नसल्याने ही जुन्या हीरोची भ्रष्ट व बिनडोक नक्कल १३१ मिनिटे सहन करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. सुभाष घईंचे मुक्ता आर्टसचे बँनर खरेतर सुमधुर गीत-संगीतासाठी प्रसिध्द आहे. मात्र अलिकडच्या काळात घई कंपनीचा सूर हरवलेला आहे, हे स्पष्ट जाणवते. नव्या हीरोसाठी शे-दोनशे खर्च केल्यापेक्षा जुन्या हीरोतील गाणी जरी ऐकली तरी जास्त आनंद मिळेल.
चला जाणून घेऊया, कसा आहे हा सिनेमा.... वाचा रिव्ह्यू...