आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाऊद्या ना बाळासाहेब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या चित्रपटाच्या निमित्ताने गिरीश कुलकर्णी दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. याशिवाय अजय-अतुलदेखील प्रथमच निर्मिती क्षेत्रात उतरत असून त्यांच्या प्रथम स्वनिर्मित चित्रपटातील गाणीदेखील मराठी रसिकांसाठी पर्वणीच असणार आहे. याबरोबरच वळू, विहीर, देऊळ यांचे दिग्दर्शक, तर मसाला, वळू व पुणे-५२ यासारख्या चित्रपटांचे निर्माते उमेश कुलकर्णी, मॅटर, स्वामी पब्लिक लिमीटेडसारखे चित्रपट केलेल्या अनुभवी निर्मात्या पूनम शेंडे तसेच अनुमती, पोस्टकार्ड, हायवेसारख्या चित्रपटांचे निर्माते विनय गानू व या चित्रपटासाठी सहनिर्माते म्हणून प्रशांत पेठे यांचीही साथ लाभली आहे. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, रिमा लागू, सई ताम्हणकर, भाऊ कदम, मनवा नाईक या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
बातम्या आणखी आहेत...