आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: चार बायकांच्या ‘कॉमेडी’ कसरतीत कपिलची ‘सर्कस’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमा किस किस को प्यार करूं
क्रिटिक रेटिंग 2.5/5
स्टार कास्ट कपिल शर्मा, एली अवराम, वरुण शर्मा, अरबाज खान, मंजरी फडनीस, सिमरन कौर मुंडी, अमृता पूरी, सई लोकूर
डायरेक्टर अब्बास-मस्तान
प्रोड्यूसर
गणेश जैन, अब्बास, मस्तान
संगीत डॉ. ज्यूस
जॉनर कॉमेडी
रहस्यमय थरारपट देण्यात अब्बास-मस्तान यांनी चांगलेच नाव कमावले आहे. 'खिलाडी', 'बाजीगर', 'सोल्जर' ही त्याची काही उदाहरणे. थरारपटातील रहस्याकडून आता ही जोडगोळी कॉमेडीकडे वळाली आहे. त्यांचा ताजा 'किस किस को प्यार करू'मध्ये मॅड कॉमेडीची भरमार आहे. कॉमेडी सर्कसचा रिंगमास्टर कपिल शर्मा या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर आला आहे. एक भोळा नायक आणि त्याच्या आयुष्यात येणा-या चार बायका व त्यांच्याशी जमवताना होणारी गमंत-जमंत या भोवती ह चित्रपट फिरतो. मराठीत दोन बायका फजिती ऐका नावाचा चित्रपट फार पूर्वी येऊन गेला होता. अशोक सराफ यांनी त्यात नायक रंगवला होता. कॉमेडी सर्कस मध्ये येणा-या पाहुण्यांची जोरदार फिरकी घेणा-या कपिलला मोठ्या पडद्यावरील पहिल्याच रोलमध्ये चांगलीच सर्कस करावी लागली आहे. कथानक जुनेच, मांडणीही जुनीच फक्त कलाकार नवे असे काहीसे चित्र किस किसको..मध्ये दिसते. नव्वदीच्या दशकात अशा चित्रपटांची एक लाटच आली होती. त्यामुळे जुनी बाटली, जुनेच द्रव्य फक्त लेबल नवे असे झाले आहे.कपिलच्याच शब्दात सांगायचे झाले तर प्रेक्षकांसाठी हा चित्रपट बाबाजी का ठल्लू ठरणारा आहे.
रहस्याला उत्तम पटकथेची जोड देत उत्सुकता शेवटपर्यंत ताणत प्रेक्षकांना खिळवून ठेवणे ही अब्बास-मस्तान यांची खासियत. हा नेहमीचा बाज सोडून ही जोडी विनोदाकडे वळली आणि येथेच घोडे पेंड खाल्ले आहे. कपिल शर्माच्या इमेजला भुलून या जोडीने मॅड कॉमेडीचा आधार घेतला असे वाटते. असे असेल तर कपिलची जबाबदारी 100 टक्क्क्यांनी वाढते. हे लक्षात घेऊन कपिलने काम करायला हवे होते. छोट्या पडद्यावर आलेल्या गेलेल्यांची खिल्ली उडवणे वेगळे आणि मोठ्या पडद्यावर दोन अडीच तास प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने गुंतवून ठेवणे वेगळे. हे कपिलला एव्हाना लक्षात आले असेलच. खरे तर अब्बास-मस्तान यांनी सर्व मसाला यात ठासून भरला आहे. तरीही किस किसको हवी तशी पकड घेत नाही. चार बायका आणि एक नायक. त्यात वारंवार येणारे योगायोगाचे प्रसंग,त्यातून घडणारे विनोद ही मॅड कॉमेडीची खरी अस्त्रे. प्रसंगनिष्ठ विनोदात अभिरूचीचे भान राखणे अत्यंत आवश्यक असते. ते ब-याच वेळा घसरलेले दिसते. अशा आशयाचे अनेक चित्रपट यापूर्वी येऊन गेले आहेत. त्यामुळे 'किस किसको...' मध्ये वेगळे काहीतरी दाखवणे ही खरी गरज होती. यालाच अलिकडच्या काळात डिफरन्शिएटर असे म्हणतात. 'किस किसको..'मध्ये डिफरन्शिएटर नसल्याने अपेक्षाभंग होतो.
पुढे वाचा, कसा आहे कपिलचा पहिला सिनेमा...