आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : आईवडिलांच्या निःस्वार्थ प्रेमाची अनुभुती देणारा \'कच्चा लिंबू\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट  कच्चा लिंबू
रेटिंग  4 स्टार
कलावंत रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, मनमीत पेम, सचिन खेडेकर, अनंत महादेवन
दिग्दर्शक प्रसाद ओक 
निर्माता  मंदार देवस्थळी
कथा जयवंत दळवी
पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर
संगीत राहुल रानडे
श्रेणी फॅमिली ड्रामा
 
 
प्रख्यात नाटककार व लेखक जयवंत दळवी यांच्या 'दुर्गी' या नाटकावर आधारित 'उत्तरायण' हा चित्रपट 2005 साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तब्बल बारा वर्षांनी आता जयवंत दळवींच्या 'ऋणानुबंध' या कादंबरीवर आधारित `कच्चा लिंबू' हा नवा मराठी आला आहे. `कच्चा लिंबू'चे दिग्दर्शन अभिनेता प्रसाद ओक याने केले असून त्याचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे व विशेष म्हणजे तो चित्रपट कृष्णधवल रंगात आहे. जयवंत दळवी यांचे बहुतांश लेखन अस्सल आहे म्हणजेच ते कोणत्याही अन्य भाषेतील साहित्यकृतींवर आधारलेले नाही. त्यांनी 'ऋणानुबंध' या स्वत: लिहिलेल्या कादंबरीवर आधारित 'नातीगोती' हे नाटक लिहिले होते. 'नातीगोती' हे गतिमंद मुलांच्या समस्या मांडणारे नाटक नाही तर गतिमंद मुलगा जन्माला आलेल्या आई-वडिलांचे भावविश्व उकलणारे, हे एक मन व्याकूळ करणारे नाटक आहे. हे नाटक रंगभूमीवर येताच या नाटकावर अनेक पारितोषिकांचा वर्षाव झाला होता. पण 'नातीगोती' नाटकामध्ये न अडकता हे नाटक ज्यावरुन बेतले त्या जयवंत दळवींच्या 'ऋणानुबंध' कादंबरीला प्रमाण मानून हा चित्रपट बनविण्यात आला आहे. 
 
पुढे वाचा, दिग्दर्शक म्हणून कसा आहे प्रसाद ओकचा पहिला चित्रपट, त्याची कथा, दिग्दर्शक आणि आता अभिनेते झालेले रवी जाधव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मनमीत पेम या कलाकारांचा अभिनय, यासंह बरेच काही.... 
 
बातम्या आणखी आहेत...