चित्रपट |
मांजा |
रेटिंग |
2 स्टार |
कलावंत |
अश्विनी भावे, सुमेध मुद्गलकर, रोहित फाळके, अपूर्व अरोरा, शिवानी टांकसाळे, मोहन कपूर, डेन्झिल स्मिथ |
कथा, पटकथा,दिग्दर्शन |
जतीन वागळे |
संगीत |
शैल- प्रीतेश |
निर्मिती |
त्रिलोक मल्होत्रा, के. आर. हरीश (इंडिया स्टोरीज) |
श्रेणी |
सायकोथ्रीलर |
'पाठलाग' हा १९६४ साली आलेला मराठी चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेला मराठी रहस्यपट. राजा परांजपे निर्मित व दिग्दर्शित हा चित्रपट इतका गाजला, की त्यावरून दिग्दर्शक राज खोसला यांनी हिंदीमध्ये `मेरा साया' हा चित्रपट निर्माण केला. रहस्यपट म्हटले, की प्रत्येक वेळेला आल्फ्रेड हिचकॉकची साक्ष काढण्याची काही आवश्यकता नाही. हिंदीपेक्षा मराठीत सायकोथ्रीलर व रहस्यपटांची संख्या तुलनेने कमीच आहे. 'पाठलाग'नंतर बऱ्याच वर्षांनी 'रानभूल', 'चेकमेट', 'रिंगा रिंगा' असे चांगले मराठी रहस्यपट येऊन गेले. पण मराठीतील चांगला सायकोथ्रीलर असे नाव घ्यायचे असेल तर ते विजू माने दिग्दर्शित 'ती रात्र' या चित्रपटाचे घ्यावे लागेल. हा चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर सायकोथ्रीलरची मराठीत तशी वानवा होती. ही उणीव थोड्या प्रमाणात का होईना 'मांजा' हा सायकोथ्रीलर म्हणवणारा चित्रपट भरुन काढेल असे वाटले होते पण या चित्रपटात थ्रीलही नाही आणि सायकोगिरी पण फार नाही.
पुढे वाचा, काय आहे या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय..