आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ground Reality जाणून घेण्यासाठी Parched एकदा नक्की बघायला हवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Plot: लीना यादव यांनी शब्द आणि तीन पत्ती सारखे चित्रपट डायरेक्ट केले आहेत. आता त्यांनी एका ठोस मुद्यावरील Parched चे डायरेक्शन केले आहे.
क्रिटिक रेटिंग 3 /5
स्टार कास्ट राधिका आपटे, तनिष्ठा चॅटर्जी , सुरवीन चावला, लहर खान, आदिल हुसैन
डायरेक्टर लीना यादव
प्रोड्युसर अजय देवगन
संगीत हितेश सोनिक
जॉनर ड्रामा
सामाजिक मुद्दे आणि परंपरांवर अनेकदा वेग वेगळ्या विषयांवर चित्रपट तयार झाले आहेत. विशेष म्हणजे यावेळीही लीना यादवने तिच्या चित्रपटांच्या माध्यमातून विशिष्ट मुद्याकडे लक्ष वेधले आहे. रिलीजपूर्वीच Parched विविध इंटरनॅशनल फेस्टीव्हलमध्ये झळकला आहे. चला तर मग जाणून घेऊयात कसा आहे हा चित्रपट.

ही गोष्ट कच्छ भागात वसलेल्या तीन मैत्रिणी राणी (तनिष्ठा चॅटर्जी), लज्जो (राधिका आपटे) आणि बिजली (सुरवीन चावला) यांची आहे. राणी आणी लज्जो या गावात काम करतात. तर बिजली नाच-गाणे करते. राणीच्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. घरात ती आई आणि मुलगा गुलाबबरोबर राहते. तर लज्जोचा नवरा तिला ओझे समजत असतो. कारण तिला मुले होत नसतात. राणी तिचा मुला गुलाबचे लग्न शेजारच्या गावातील जानकी(लहर खान) बरोबर लावून देते. गोष्टीत अनेक चढ उतार आहेत. ही गोष्ट कशी पुढे सरकते आणि तिचा शेवट कसा होतो हे पाहण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल.

डायरेक्शन...
चित्रपटाचे डायरेक्शन चांगले आहे. एकिकडे दिवसा आणि दुपारच्या वेळी केलेले शूट आणि रात्रीच्या अंधारात घडणाऱ्या घटनाही अगदी योग्य प्रकारे दाखवल्या आहेत. शुटिंगचे लोकेशन्स चांगले आहेत. सिनेमॅटोग्राफीही चांगली आहे. चित्रपटाची पटकथा लिहिताना महिलांसाठी असलेल्या सन्मानाची भावना ग्रामीण शहरी भागांमध्येही सारखीच राहील याची काळजी घेण्यात आली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी लोक थिएटरमध्ये जातील की नाही, हा मुद्दा आहे. पण तरीही ज्या प्रकारच्या प्रेक्षकांसाठीचा हा चित्रपट आहे ते नक्कीच याला मिस करणार नाहीत. चित्रपटाची लांबीही दोन तासांपेक्षा कमी आहे. तीही चांगली बाब आहे.

स्टारकास्टचा परफॉर्मंस..
तनिष्ठा चॅटर्जीने आई, सासू आणि विधवा महिला ही भूमिका चांगली रंगवली आहे. राधिका आपटेनेही लज्जो अगदी सहज साकारली आहे. तिच्याशी लगेच कनेक्ट करता येते. सुरवीन चावला सर्वांना आश्चर्यचकित करते. ती राणी लज्जोच्या भूमिकांसाठी महत्त्वाचा दुवा ठरते. तसेच लहर खान, आदिल हुसैन आणि इतरांच्या भूमिकाही चांगल्या आहेत.
संगीत..
चित्रपटाचे संगीत चांगले आहे. गोष्टीचा फ्लेवर पाहता हितेश सोनिक यांनी चांगले संगीत दिले आहे.

पाहावा की नाही
जर गंभीरविषयावर आधारित आणि अभिनयाची मेजवानी असलेला चित्रपट आवडत असेल तर पार्च्ड नक्की पाहायला हवा.
बातम्या आणखी आहेत...