Home »Reviews »Movie Review» Movie Review Babumoshay Bandookbaaz

Movie Review: 'बोल्ड' तसेच 'बोअरींग' आहे 'बाबूमोशाय बंदुकबाज', कथेतच नाही दम

दिव्य मराठी वेब टीम | Aug 25, 2017, 13:21 PM IST

रेटिंग2/5
कलाकारनवाजुद्दीन सिद्दिकी, बिदिता बाग, श्रद्धा दास, दिव्या दत्ता
दिग्दर्शककुशान नंदी
संगीतगौरव दगाओंकर, अभिलाष लाकरा, जॉल दुब्बा, देबज्योति मिश्रा
निर्माताकुशन नंदी, किरन श्याम श्रॉफ, अस्मित कुंदर
जॉनरएक्शन थ्रिलर
दिग्दर्शक कुशान नंदी यांचा चित्रपट 'बाबूमोशाय बंदूकबाज' आज रिलीज झाला आहे. '88 Antop Hill'(2003), 'हम दम'(2005) या चित्रपटानंतर कुशान नंदी यांचा हा तिसरा चित्रपट आहे.
कथा
चित्रपटाची कथा कॉन्ट्रेक्ट किलर बाबू बिहारी म्हणजे नवाजुद्दीन सिद्दिकी याची आहे. जो पैशांसाठी कधी मिनिस्टर तर कधी इतर लोकांचा खून करतो. यादरम्यान त्याची ओळख फुलवा म्हणजेच (बिदिता बाग) नावाच्या मुलीसोबत होते. जी शूज शिवण्याचे काम करत असते. या दोघांची लव्हस्टोरी हळूहळू पुढे जाते. कथेमध्ये ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा बाबूच्या किलींग बिझनेसमध्ये बाके म्हणजेच (जतिन गोस्वामी) नावाच्या माणसाची एंट्री होते. या दोघांमध्ये स्पर्धा सुरु होते आणि या कथेचा शेवट नेमका काय होतो ते जाणून घेण्यासाठी आपल्याला चित्रपट पाहावा लागेल.
पुढच्या स्लाईडवर वाचा, कसे आहे चित्रपटाचे दिग्दर्शन, संगीत, कलाकारांचा अभिनय..

Next Article

Recommended