आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: काय असते \'स्त्रीधन\' सांगतेय \'बद्री की दुल्हन\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट बद्रीनाथ की दुल्हनिया
रेटिंग साडे तीन स्टार 
कलाकार   अलिया भट, वरुण धवन 
दिग्दर्शक  शशांक खेतान
श्रेणी  रोमँटिक ड्रामा 
 
   
भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ मानली जाते. भारतातील कुटूंब पद्धती, येथील चालीरिती, सणवार, नातेसंबंध याचे जगाला मोठे आकर्षण. परंतु अलिकडच्या काळात वंशाला दिवाच हवा, मुलगाच जन्माला यायला हवा या बुरसटलेल्या मानसिकतेने या संस्कृतीवर काजळी वाढली आहे. त्यातच हुंडा देणे-घेणे या कुप्रथेने या संस्कृतीला कलंक लावायचे काम केले आहे. सध्या राज्यात गाजत असलेल्या म्हैसाळ येथील भ्रूणहत्येच्या प्रकरणामुळे तर या मानसिकतेची किळस यावी अशी स्थिती आहे. चित्रपट हा समाजाचा आरसा मानला जातो. नेमके याचे प्रतिबिंब बद्रीनाथ की दुल्हनिया मध्ये उमटले आहे. मुलगाच सर्वकाही, हुंडा हीच प्रतिष्ठा या काळजालेल्या  नीच मनोवृत्तीवर बद्रीनाथ की... मधून हलक्या फुलक्या मांडणीतून जबर चिमटा काढला आहे.
 
हुंडा प्रथेमुळे मुलीकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टीकोन, त्यामुळे स्त्रीमनाची होणारी कुचंबणा, येणारी सून म्हणजे धनादेश या सारख्या अनेक बाबींवर कडक भाष्य यात आहे. बद्रीनाथ की दुल्हनिया उत्तम मनोरंजन तर करतोच शिवाय समाजातल्या कुप्रथांवर प्रहार करत सर्वांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे कामही करतो. काय असते स्त्रीधन ? या प्रश्नाचे बहुआयामी उत्तर बद्रीनाथची दुल्हन देते. 
 
 
पुढे वाचा, काय आहे चित्रपटाची कथा, कसा आहे वरुण-आलियाचा अभिनय, शशांक खेतान यांचे दिग्दर्शन आणि बरंच काही... 
बातम्या आणखी आहेत...