आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : केवळ रितेशच्या अभिनयासाठी बघावा \'बँगिस्तान\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटबँगिस्तान
रेटिंग** 2/5
दिग्दर्शककरण अंशुमन
कलाकाररितेश देशमुख, पुलकित सम्राट, जॅकलिन फर्नांडिस, आर्या बब्बर, तोमाश करोलक, चंदन रॉय सान्याल
श्रेणीड्रामा

हिंदू मुस्लिम हा धर्मवाद आणि जगभरात दहशत, दबदबा निर्माण करण्यासाठी आखलेली मोहिम या केंद्रबिंदू भोवती फिरणारा बँगिस्तान आज प्रदर्शित झाला. रितेश देशमुख आणि पुलकित सम्राट यांच्या मध्यवर्ती भुमिका असलेला हा विनोदपट शेवटाकडे जाताना मात्र, जातीधर्माच्या बुरख्याखाली लपलेल्या माणुकीला साद घालून जातो.
माणुसकीला साद घालणारा एक चांगला विषय दिग्दर्शक करण अंशुमन याने मांडला आहे. राम संपत यांची तीनच गाणी चित्रपटात आहेत. कथा पुढे सरकवण्यात त्यांची भूमिका आहे. ट्रेलरवरुन धमाल विनोदी वाटणारा चित्रपट खळखळून हसवणारा मुळीच नाही. पुलकित सम्राटने भूमिकेत जीव ओतला आहे. रितेशला आता बॉलीवुडची हातोटी अंगवळणी पडली असल्याचे क्षणोक्षणी जाणवते. टोटल फिल्मी वाटणारा रितेश प्रेक्षकांचे लक्ष वेधू शकत नाही. दोघे तरुण धर्म बदलून मित्र होतात. गुपचूपपणे बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतात. या सगळ्यात माणुस म्हणून एकमेकांशी बांधलकी निर्माण होते. जगातील सर्वात मोठा धर्म माणुसकीचाच याच खुणगाठ दोघांना पटते आणि मग, भावनिक धमाल उडते.
पुढे वाचा, कशी सिनेमाची कथा, कलाकारांचा अभिनय आणि बरंच काही..
बातम्या आणखी आहेत...