Home | Reviews | Movie Review | Movie Review Bhoomi

Movie Review: घासुन गुळगुळीत झालेल्‍या कथेने संजय दत्‍तचे कमकुवत कमबॅक आहे 'भूमि'

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Sep 22, 2017, 12:28 PM IST

संजय दत्‍तचा कमबॅक सिनेमा 'भूमि' रिलिज झाला आहे. ओमंग कुमार यांनी 'भूमि'चे दिग्‍दर्शन केले आहे. जाणुन घेऊया, कसा बनला आह

 • Movie Review Bhoomi
  रेटिंग 2/5
  स्टारकास्ट संजय दत्त, अदिति राव हैदरी, सिद्धांत गुप्ता, शरद केळकर, शेखर सुमन
  डायरेक्टर ओमंग कुमार
  म्यूझिक सचिन-जिगर, इस्माइली दरबार
  प्रोड्युसर भूषण कुमार, संदीप सिंह, ओमंग कुमार
  जॉनर अॅक्शन थ्रिलर
  संजय दत्‍तचा कमबॅक सिनेमा 'भूमि' रिलिज झाला आहे. ओमंग कुमार यांनी 'भूमि'चे दिग्‍दर्शन केले आहे. जाणुन घेऊया, कसा बनला आहे सिनेमा...
  कथा
  उत्‍तर प्रदेशात आग्रा येथे राहणा-या एका वडील आणि त्‍याच्‍या मुलीबद्दल ही कथा आहे. अरुण सचदेव (संजय दत्‍त) त्‍याची मुलगी भूमिसोबत (आदिती राव हैदी) राहत असतो. अरुणचे बुटांचे दुकान असते. भूमि आणि निरज (सिद्धांत गुप्‍ता) यांचे एकमेकांवर प्रेम असते आणि ते दोघेही लवकरच लग्‍न करणार असतात. सर्वकाही सुरळीत सुरु असताना धोली (शरद केळकर) नावाच्‍या व्हिलनमुळे या बापलेकीवर मोठे संकट येते. धोलीची गँग भूमिवर रेप करते. त्‍यामुळे भूमि आणि अरुणचे जीवन पूर्णपणे बदलून जाते. न्‍यायासाठी ते पोलिस ते कोर्ट सगळीकडे चकरा मारतात. मात्र त्‍यांना न्‍याय मिळतो का? अरुण आणि भूमि शेवटी न्‍यायासाठी काय करतात? या प्रश्‍नांची उत्‍तरे मिळवण्‍यासाठी तुम्‍हाला सिनेमा पाहावा लागेल.
  पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, सिनेमाचे दिग्‍दर्शन, संगीत आणि अभिनयाविषयी...
 • Movie Review Bhoomi
  दिग्‍दर्शन 
  ओमंग कुमारने सिनेमाचे दिग्‍दर्शन चांगले केले आहे. सिनेमातील आर्टवर्कही चांगले आहे. मात्र कथेत नाविण्‍य नाही. तीच ती न्‍यायासाठी संघर्षाची कथा घासुनपुसन प्रेक्षकांसमोर आणण्‍यायात आली आहे.  याशिवाय सिनेमात एकही सरप्राईज एलिमेंट नाही. प्रत्‍येक सिनेमात पुढे काय होईल याचा सहज अंदाज लागतो. सिनेमाच्‍या डॉयलॉग्‍समध्‍येही काहीच दम नाही. दीर्घ काळ पडद्यापासनू लांब राहिल्‍यावर कमबॅकसाठी 'भूमि'ची निवड करण्‍याचा संजय दत्‍तचा निर्णय चुकीचा ठरण्‍याची जास्‍त शक्‍यता आहे.     
   
 • Movie Review Bhoomi
  अभिनय 
  अभिनयाच्‍या बाबतीत बोलायचे तर संजय दत्‍तने शानदार परफॉर्मंस दिला आहे. पित्‍याची भूमिका त्‍याने अगदी जिवंत केली आहे. संजय दत्‍तच्‍या काही सीन्‍समुळे आपल्‍या डोळ्यातही पाणी येते. आदितीनेही चांगली अॅक्‍टींग केली आहे. संजय दत्‍तच्‍या मुलीच्‍या रुपात ती प्रेक्षकांना आवडायला लागते. व्हिलनच्‍या भूमिकेत शरद केळकर यांनीही प्रभावी अॅक्‍टींग केली आहे. एकंदर अभिनयाच्‍या बाबतीत या सिनेमात कोणाकडूनही आपली निराशा होत नाही. 
 • Movie Review Bhoomi
  संगीत 
  या सिनेमाच्‍या गाण्‍यांना प्रेक्षकांनी पसंत केलेले नाही. त्‍यामुळे संगीताचा सिनेमाला विशेष काही फायदा झाला, असे नाही. यावर अधिक काम करण्‍याची गरज होती.
 • Movie Review Bhoomi
  पाहावा की नाही 
  तुम्‍ही संजय दत्‍तचे डायहार्ड फॅन असाल तर हा सिनेमा तुमच्‍यासाठी आहे. नाहीतर हा सिनेमा टीव्‍हीवर येण्‍याची वाट पाहू शकता. 

Trending