आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MOVIE REVIEW Of Marathi Film Coffee Ani Baracha Kahi

MOVIE REVIEW : हुरहूरणाऱ्या प्रेमाचा नाजूक धागा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट कॉफी आणि बरंच काही
रेटिंग **** चार स्टार
कलावंत प्रार्थना बेहरे, वैभव तत्ववादी, भुषण प्रधान, नेहा महाजन,अनिता दाते, सुयश टिळक, विद्याधर जोशी, अश्विनी एकबोटे, संदेश कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, सुहास जोशी,अविनाश नारकर,अनुजा साठे आणि बप्पा जोशी
दिग्दर्शक प्रकाश कुंटे
श्रेणी रोमँटिक
काळासोबत लग्न आणि प्रेमाच्या संकल्पना बदलल्या आहेत. व्यक्त करण्याची पद्धत बदलली तरीही प्रेम हे प्रेम आहे अन ते व्यक्त शब्दांमध्ये व्यक्त करायला हवे. प्रेम ही मनाला हूरहुर लाऊन जाणारी सुंदर भावना आहे. प्रेम हे आपल्या प्रत्येक हालचालीतून वागण्यातून आणि तरंगातून समोरच्यापर्यंत पोहचत असते. पण तरीही त्यामध्ये शब्दांचे विलक्षण महत्त्व आहेच. हे महत्त्व अधोरेखित करणारा प्रकाश कुटे दिग्दर्शित “कॉफी आणि बरच काही' या एक चांगला चित्रपट आज प्रदर्शित झाला.
वृत्तवाहिनीच्या पत्रकारितेतून अभिनयात वळलेली प्रार्थना बेहरे, वैभव तत्ववादी, भूषण प्रधान आणि नेहा महाजन या युवा अभिनेत्यांवर चित्रीत झालेला हा चित्रपट. प्रार्थनाचा अभिनय सुंदर आणि सहज होता. चित्रपटावर तिने छाप पाडली. आदित्य गुप्ते दिग्दर्शित ढाबा भटींडातून मराठीत तिने पर्दापण केले खरे पण चित्रपट अपयशी ठरल्याने या सुंदर, गुणी अभिनेत्रीची दखल घेतली गेली नव्हती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मितवामध्ये ती चांगल्या टिमसोबत झळकली. तिच्या अभिनयात आत्मविश्वास होता. तर वैभवचा सामान्य चेहराही प्रेक्षकांना आपलेसे करणारा होता.
आदिती मोघेने पटकथेवर विचारपुर्वक काम केलेले आहे. प्रत्येक घरात दिसेल अशी पात्र चित्रपटात पेरण्यात आली आहेत, आपल्याच घरातील कुणीतरी असे बोलतात हे वेळोवेळी जाणवते. उत्तम चित्रकरण, तंत्रकौशल्य, दमदार पण सहज, सोपे संवाद आहेत. चित्रपटाचे संगीत ग्लोबल संगीताची सार्धम्य साधणारे आहे, त्यामुळे मराठी चित्रपटाच्या कक्षा रूंदावल्याचे जाणवते. तरुणाला अपिल करेल, त्यांचे विचार व्यक्त करुन दाखवणारा हा चित्रपट आहे. सुंदर प्रेम कथा फुलवण्यात आली आहे. मात्र, तरीही चित्रपट खूपच हळूवारपणे पुढे सरकतो असे जाणवते. 20 मिनिटं किंवा अर्धा तासात सांगता येईल अशी गोष्ट सांगण्यासाठी 2 तास देण्यात आले आहेत. कुटूंबासह पाहता येईल असा हा चित्रपट आहे.
कथा :
जाई नावाची तरुणी तिच्याच ऑफीसच्या निशादच्या प्रेमात पडते. निशाद अतिशय शांत आणि व्यक्त न होणारा पण वागण्यातूनच खूप काही सांगणारा तरुण. जाईच्या घरी तिला पाहण्यासाठी वडिलांच्या मित्राचा मुलगा येतो, तेव्हा ती त्यालाच आपले प्रेम असलेल्या मुलाबद्दलची सर्व कहाणी सांगते. इकडे निशाद तिच्यासमोर आपले प्रेम ठेवण्यासाठी तिची वाट पाहतो. शेवटी पहायला आलेला मुलगा जाईला प्रेम व्यक्त करण्याचे महत्त्व कसे पटवून देतो, ती निशादला प्रपोज करते का? की निशाद तिला करतो हे यात पाहणे एक सुखद अनुभव आहे.
पुढे वाचा, उर्वरित रिव्ह्यू...