आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOVIE REVIEW : \'डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी\' उत्कंठावर्धक... तरीही...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमाचे नाव डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी
रेटिंग *** तीन स्टार
कलावंत सुशांत सिंह राजपूत, स्वस्तिका मुखर्जी, आनंद तिवारी, दिव्या मेनन, मियांग चँग, नीरज कबी
दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी
निर्माता आदित्य चोप्रा
श्रेणी
सस्पेन्स-थ्रीलर
'खोसला का घोसला', 'ओय लकी..लकी ओय', 'बॉम्बे टॉकीज' यासारखे वेगळ्या विषयावरचे, आगळ्या मांडणीचे चित्रपट देणारा दिग्दर्शक म्हणून आपण दिबाकर बॅनर्जीला ओळखतो. दिबाकरने आता आपल्यासमोर आणली आहे रहस्यकथा. दूरदर्शनवर रजत कपूरने कधी काळी गाजवलेली ही व्यक्तीरेखा मोठ्या पडद्यावर सिध्दार्थ राजपूतने साकारली आहे. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात कोलकाता येथे घडणारी ही कथा. कथा काल्पनिक असली तरी दिबाकरने ती उत्कंठावर्धक बनवली आहे. पडद्यावर 150 मिनिटे रंगणारे हे नाट्य पसरट झाले आहे. आणि सर्वाधिक खटकणारी बाब म्हणजे चित्रपटाचा संथपणा. रहस्यकथा पडद्यावरमांडताना वेग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. एकामागून एक घटना घडत असताना प्रेक्षकांना उसंत मिळणार नाही, तो खिळून राहणे खूपचं आ‌वश्यक असते. येथे उत्कंठा आहे परंतु संथपणा खटकतो. बाकी बक्षी तुमच्या अपेक्षा पूर्ण करतो. 1943 च्या आसपासचे कोलकाता, तेव्हांची माणसे, त्यांच्या वेशभुषा, केशभूषा, रस्ते, गल्ल्या, वातावरण यातून एक वेगळा फील येतो. रहस्याचा भेद शेवटपर्यंत ताणण्यात दिग्दर्शक चांगलाच यशस्वी ठरला आहे.
कथा :

चीन व जपान मधील ड्रग माफियांना कोलकात्यात घुसून राज्य करायचे आहे. त्यातून एका रसायन शास्त्रज्ञाचा खून होतो. व्योमकेश बक्षी हा डिटेक्टिव्ह त्याच्या पध्दतीने या खूनाचा माग काढतो व ड्रग माफियाचे मनसुबे उधळून लावतो.
पुढे वाचा, उर्वरित रिव्ह्यू...