आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MOVIE REVIEW : धुरंधर भाटवडेकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या आयुष्यातल्या सगळ्या व्याप-तापातनं रिटायर्ड झालेले दोन म्हातारे एका वृध्दाश्रमात भेटतात. पटत नसताना, वृध्दाश्रमातल्या नियमांखातर एकत्र राहतात आणि भिन्न विचार प्रवृत्ती असलेले हे दोघं वृध्दाश्रमाच्या संचालिकेच्या प्रेमात पडतात. असा कथा भाग घेऊन क्षितीज झारापकर यांनी ‘धुरंधर भाटवडेकर’ हा चित्रपट दिग्दर्शित केलाय.
अविनाश धुरंधर आणि विश्वंभर भाटवडेकर या भूमिकांमध्ये मोहन जोशी आणि डॉ. मोहन आगाशे आहेत म्हटल्यावर हा चित्रपट धमाल जुगलंबदीची पर्वणीच असणार असं वाटतं होतं. त्यातच किशोरी शहाणे यांनाही मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळतंय म्हटल्यावर अपेक्षा उंचवणं सहाजिक आहे. पण चित्रपट पाहिल्यावर आपल्या भ्रमाचा भोपळा फुटतो.
पहिल्या भागात शौकिनसारखा वाटणारा चित्रपट, दुस-या भागामध्ये तर कोसळतोच. हा चित्रपट घाईघाईत उरकला असल्याचंही जाणवतं. गिरीश ओक यांचा ट्रॅक सुरू होणार असं वाटतं असताना तो संपतो. अचानक एखादं कॅरेक्टर चित्रपटात येतं. मग ते अचानक गायब होतं. काही ट्रॅक तर अगदी अनावश्यक वाटतात. चित्रपटात खरं तर, मोहन जोशी, डॉ. मोहन आगाशे आणि किशोरी शहाणे यांच्याशिवाय जयंत सावरकर आणि विजय कदम ही होते. पण एवढ्या सगळ्या टॅलेंटेड कलावंताना निर्माते-दिग्दर्शकाने फुकट घालवल्यासारखं वाटतं. फक्त सशक्त स्टारकास्ट असून चालत नाही तर संहिता, आणि संकलन या गोष्टी ही चित्रपटात महत्वाच्या असतात. जर व्यवस्थित हाताळल्या नाहीत. तर चित्रपटाचे कसे तीन तेरा वाजतात. ते हा चित्रपट पाहताना कळतं.