आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MOVIE REVIEW : दिल धडकने दो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमादिल धडकने दो
रेटिंग*** 3/5
कलावंतप्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, शेफाली छाया, अनिल कपूर, राहूल बोस आणि रणवीर कपूर
दिग्दर्शकझोया अख्तर
श्रेणीफॅमिली ड्रामा
'लक बाय चान्स' आणि 'जिंदगी न मिले दोबारा' अशा चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या झोया अख्तरचा 'दिल धडकने दो' चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. यापुर्वी धमाल मस्ती आणि मित्रांतील बंध दाखणाऱ्या झोयाने या चित्रपटात पती पत्नीच्या नात्यातील भावनिक, वैचारिक गुंफण सुरेखरित्या मांडली आहे. उत्तम स्टारकास्ट आणि चांगली गाणी असली तरीही 'जिंदगी...'ची मजा यामध्ये नाही.
यावेळी झोयाने एक वेगळा विषय हाताळला आहे. यापुर्वी तिने केलेल्या चित्रपटांत आयुष्याचा मोठा अर्थ मित्रांच्या गमतीतून समर्थपणे मांडला होता. यामध्ये अनिल कपूर यांना यंग टिमसोबत पाहणे हा मस्त अनुभव आहे. चित्रिकरणातील अफाट दृष्टीकोन प्रेक्षकांना भावणारा आहे. यापलीकडे जाऊन पती पत्नी नात्यालाही झोयाने उत्तमपणे मांडले आहे. यामुळेच कदाचित काही ठिकाणी इमोशनल अत्याचार जाणवतो. झोयाच्या चित्रपटातील हा इमोशनल टच विचार करायला लावणारा आहे. 'बॅन्ड बाजा बारात' आणि 'लेडीज व्हर्सेस रिकी बहेल' मध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अनुष्का-रणवीर जोडी पुन्हा एकदा पाहणे हा नवा अनुभव आहे.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, कशी आहे सिनेमाची कथा, संगीत, दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय...