आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOVIE REVIEW : पुनर्जन्माच्या समीकरणावर सनीच्या प्रेक्षणीय ‘लीला’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट
एक पहेली लीला
रेटिंग ** अडीच स्टार
दिग्दर्शक बॉबी खान
कलावंत सनी लिओन, जय भानुशाली, रजनीश दुग्गल, राहुल देव, मोहित अहलावत, जस अरोरा, शिवानी टांकसाळे
श्रेणी
रोमँटिक, थ्रिलर
आपल्याकडे चित्रपट बनवताना काही खास फॉर्म्युले कायम लक्षात घेतले जातात. जसे प्रेमकथा, माँ-बाप के खून का बदला, जमीनदारांकडून छळ व त्याला धडा शिकवणारा अँग्री यंग मॅन वैगेरे वैगेरे... त्यातलाच एक आणखी एक आहे पुनर्जन्म. अगदी कृष्णधवल काळापासून पुनर्जन्म हे एक हमखास यशाचे समीकरण मानण्यात आले आहे. 'एक पहेली लीला' हा ताजा चित्रपटही पुनर्जन्माच्या समीकरणावर आधारलेला आजच्या काळातला चित्रपट आहे. त्याला जोड आहे सनीबाई लिओन या आकर्षक नावाची.
कधीकाळी पोर्न फिल्ममधून आपल्या लीला दाखवणारी ही ललना आता बॉलिवूडमध्ये चांगलीच स्थिरावती आहे. तर या चित्रपटातली लीला मात्र भारतीय संस्कृतीशी सुसंगत आहे. दिग्दर्शक बॉबी खानने हाताळणीही चांगली केली आहे, त्यामुळे या जन्मा-जन्माच्या अगाध लीला बऱ्यापैकी सुसह्य ठरल्या आहेत. हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांना पुनर्जन्माचे आकर्षण खूपच. त्याचा एक वेगळा प्रेक्षकवर्गही आहे. दिलीपकुमार-वैजयंतीमाला जोडीचा 'मधुमती', सुनील दत्त-नूतनचा 'मीलन' आणि ऋषी कपूर-सिमी गरेवालचा 'कर्ज' ही या थीमवरची काही गाजलेली उदाहरणे. या यादी वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की या सर्व चित्रपटाची गाणी आजही आपल्या लक्षात आहेत.
पुनर्जन्माच्या कथेला उत्तम गीत-संगीताची साथ लाभली की तिकीटबारीवरचे यश पक्के असे हे समीकऱण आहे. लीलामध्येही गीत-संगीतावर चांगला भर दिला आहे. काही अंशी तो यशस्वीही ठरला आहे.
कथा :
तीनशे वर्षांपूर्वी राजस्थानातील लीला (सनी लिओन) व श्रवण (रजनीश दुग्गल) ही एकमेकांवर प्रेम करणारी जोडी. भैरव (राहुल देव) या शिल्पकाराची नजर लीलावर पडते. तो तीची मूर्ती तयार करता-करता तिच्या प्रेमात पडतो. मात्र लीला व श्रवणच्या प्रेमाबाबत समजल्यानंतर त्या दोघांनाही ठार करतो. तीनशे वर्षांनंतर लीला मीरा नावाने जन्म घेते, तर श्रवण व भैरवही जन्म घेतात, त्यांच्या पुन्हा गाठीभेटी होऊन शेवटी सर्व हिशेब चुकता होतो.
दिग्दर्शन :
बॉबी खानने दिग्दर्शनाची सूत्रे उत्तम हलवली आहेत. प्रेक्षकांना खूर्चीत खिळवून ठेवण्यात तो बराच यशस्वी ठरला आहे. काळाची उत्तम सरमिसळ दाखवताना त्याने कोठेही गल्लत होऊ दिलेली नाही.
पुढे वाचा, उर्वरित रिव्ह्यू...