आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Reviwe : गाण्याप्रमाणेच 'टन टना टन.. टन टन..' आहे जुडवा 2

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
रेटिंग 4/5
स्टारकास्ट वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिस, तापसी पन्नू, अनुपम खेर, उपासना सिंह, राजपाल यादव, पवन मल्होत्रा, अली असगर, विवान भतेना
डायरेक्टर डेवीड धवन
म्यूजिक साजीद-वाजीद, मित ब्रदर्स, संदीर शिरोडकर, अनु मलिक

प्रोड्यूसर
साजीद नाडियाडवाला
जॉनर कॉमेडी ड्रामा
 
 1997 मध्ये सलमान खानला घेऊन तयार केलेल्या जुडवा चित्रपटाची लोकप्रियता शिगेला पोहचली होती. गाणी, संवाद, दिग्दर्शन सर्वच बाजुंनी यशस्वी ठरलेल्या या चित्रपटाचा रिमेक म्हणजे 'जुडवा 2'. वरुण धवनची मुख्य भूमिका असलेला 'जुडवा 2' पहिल्या चित्रपटाच्या तोडीस तोड असा ठरला आहे. धमाल मनोरंजन, झकास संवाद अन् दमदार अभिनयाने चित्रपट जोरदार झाला आहे. 
 
एरव्ही रिमेक्सना हवे तसे यश मिळत नाही. पहिल्या चित्रपटातील कलावंताशी तुलना होत राहते. त्यात पहिला चित्रपट सलमान आणि करिश्मा सारख्या कलाकारांनी केलेला असेल तर काही बोलायलाच नको. पण या चित्रपटात सलमानच नव्याने पडद्यावर दिसतो आहे असे वाटत राहते. इतके साम्य साधतानाही स्वत:चे वेगळेपणही वरुणने दाखवले आहे. वरुण धवनने वेगळीच किमया यामध्ये साधली आहे. डेव्हिड धवनला नवा गोविंदा गवसला असे म्हणायलाही हरकत नाही. चित्रपटातील बाप-लेकाची केमिस्ट्री पाहून ते वारंवार जाणवते. वरुणने विनोदाचा टायमिंग सुंदर साधला आहे. तर दिग्दर्शक म्हणून डेव्हिड धवन यांनीही त्यांचा हातखंडा पुन्हा सिद्ध करुन दाखवला आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, चित्रपटाची कथा, संगीत, दिग्दर्शन आणि अभिनयाबाबत... 
बातम्या आणखी आहेत...