सिनेमाचे नाव |
गब्बर इज बॅक |
क्रिटिक रेटिंग |
2/5 |
कलाकार |
सुनिल ग्रोवर, जयदीप अहलावत
|
दिग्दर्शक |
राधाकृष्ण जगर्लामुडी अर्थातच कृष |
निर्माते |
संजय लीला भन्साळी |
संगीत दिग्दर्शक |
चिरंतन भट्ट, यो यो हनी सिंह, मंज मसिक |
जॉनर |
अॅक्शन थ्रिलर |
'गब्बर इज बॅक' हा सिनेमा 2002मध्ये आलेल्या 'रमन्ना' या अॅक्शन थ्रिलर तामिळ सिनेमाचा रिमेक आहे. याचे दिग्दर्शन कृषने केले आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र हा सिनेमा काहीप्रमाणात निराश करणारा आहे. गब्बर हिंदी सिनेमांमधील लोकप्रिय खलनायकांपैकी एक आहे. 1975मध्ये आलेल्या सुपरहिट 'शोले'मध्ये अमजद खान यांनी साकारलेल्या गब्बरच्या पात्रापेक्षा
अक्षय कुमारच्या गब्बरचा अवतार थोडा हलका वाटतो.
काय आहे सिनेमाची कहाणी-
सिनेमाची कहाणी संवादातून कळते. गब्बर (अक्षय कुमार)चा 'पचास-पचास कोस दूर जब कोई रिश्वत लेता है तो सब कहते है, मत ले...वरना गब्बर आ जाएगा' आणि बिजनेसमॅन दिग्विजय पाटिल (सुमन तलवार) का 'रिश्वत ली तो गब्बर मार देगा और नही ली तो मै मार दूगा' ह् संवाद प्रेक्षकांना ऐकायला मिळतात. अर्थातच सिनेमाची कहाणी गब्बर नावाच्या एका व्यक्तीची आहे, तो भ्रष्टाचाराच्या विरोधाच लढतो. समाजात पसरलेल्या भ्रष्टाचारला नष्ट करण्यासाठी तो प्रत्येक भ्रष्टाचारी व्यक्तीशी लढतो. मग तो तहसीलदार असो अथवा रुग्णालय व्यवस्थापनेशी जोडलेला व्यक्ती किंवा पोलिस. या सर्वांशी तो भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यासाठी अनेक चाली वापरतो. तो कोण-कोणत्या समस्यांना सामोरे जातो, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यासाठी काय-काय करतो हे सर्व तुम्हाला सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल. सिनेमात जयदीप अहलावतने सीबीआय चीफ, सुमन तलवारने उद्योगपती दिग्विजय पाटील, श्रुती हसनने अॅडव्होक्ट श्रुती आणि सुनील ग्रोवरने पोलिस निरीक्षक साधूचे पात्र साकारले आहे.
दिग्दर्शन-
राधाकृष्ण जगर्लामुडी अर्थातच कृषने अक्षय कुमारच्या अॅक्शन हिरोची प्रतिमा जपण्यासाठी प्रयत्न केला आहे. दिग्दर्शक म्हणून तो पूर्णत: अपयशी ठरला. सिनेमात असा कोणताच संवाद किंवा सीन नाहीये, ज्यावर प्रेक्षक शिट्या वाजवू शकतील.
अभिनय-
'गब्बर इज बॅक'मध्ये अक्षयला खलनायक बनून नायकाच्या रुपात सादर करण्यात आले आहे. अक्षयच्या उपस्थितीने सिनेमात अॅक्शनचे भरमसाट सीन्स आहेत. त्याच्या पात्रात नावीन्यता आहे. स्क्रिनप्ले हलकी असल्याने श्रुतीची भूमिका दमदार दिसत नाही. सुमन तलवार दक्षिणमध्ये सुपरस्टार असले तरी या सिनेमात त्यांची भूमिका अजिबात दमदार नाहीये.
करीना कपूर खान केवळ गाण्यामध्ये दिसली आहे. शिवाय, तिची या सिनेमात कोणतीच भूमिका नाहीये. पोलिस निरीक्षक साधच्या पात्रात सुनील ग्रोवर आणि सीबीआय चीफच्या पात्रात जयदीप अहलावत एकदम फिट बसले आहेत. दोघांचा अभिनयदेखील थोडासा प्रभावी आहे.
का पाहावा?
सिनेमात नावीन्यता हवी तेवढी नाहीये. सिनेमा खूपच हळूवार दाखवला आहे. परंतु तुम्ही अक्षय कुमारचे चाहते आहात आणि त्याचा प्रत्येक सिनेमा पाहण्याचा मोह टाळू शकत नसाल तर तुम्ही हा सिनेमा पाहू शकता.