आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Movie Review: मन जिंकणारी दिलखुलास ‘हॅपी’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट हॅपी भाग जायेगी
रेटिंग ३ स्टार
कलावंत अभय देओल, डायना पेंटी, जिमी शेरगील, अली फजल, मोमल शेख आणि पियुष मिश्रा
दिग्दर्शक मुद्दस्सर अजीज
संगीत सोहेल सेन
कथा/ पटकथा मुद्दस्सर अजीज
श्रेणी विनोदीपट

‘सारा पाकिस्तान इंडिया का नमक खाता है’ किंवा ‘काश गांधीजी पाकीस्तान में होते’ अशा दाद मिळवाऱ्या संवादातून फुलणारी विनोदी प्रेमकहाणी ‘हॅपी भाग जायेगी’. दिग्दर्शक मुद्दसर अजिज यांनी भारत पाकिस्तानचा धागा पकडत अमृतसर ते लाहौर अशी ही कहाणी फुलवली आहे. अभय देओल, डायना पेंटी आणि जिम्मी शेरगील यांनी दमदार अभिनय करत प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. प्रत्येक वर्गाला भावणारा हा एक सुरेख चित्रपट ठरला आहे.
'जब वुई मेट'मध्ये ‘गीत’ असो किंवा 'तन्नू वेडस मन्नु'मध्ये ‘तन्नू’ दोघी लग्नातून पळून जातात आणि चित्रपट हीट होतो. तसाच अनुभव या चित्रपटातही येतो. एकही स्टार कलावंत नसला, पुर्वी हाताळलेल्या कथांशी सार्धम्य असले तरीही चित्रपटभर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे कौशल्य या कथेत आहे. चित्रपटाचे संवाद आणि कलावंतांचा अभिनय ही या चित्रपटाची बलस्थान आहेत. आतापर्यंतच्या चित्रपटात अभिनेत्री लग्नातून पळून गेल्या, मात्र हॅपी अमृतसरहून पळते ती थेट लाहौरपर्यंत. लाहोरमध्ये गेल्यावर आपल्या दिलखुलास स्वभावातून ती प्रत्येकाचा बँन्ड वाजवून टाकते.

पुढे वाचा, कसा आहे कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन, संगीत आणि सिनेमा बघावा की नाही...
बातम्या आणखी आहेत...