आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOVIE REVIEW : प्रेक्षकांना ‘मूर्ख’ बनवत नातेसंबंधावर चुरचुरीत भाष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट कागज के फूल्स
रेटिंग ** दोन स्टार
दिग्दर्शक अनिल कुमार चौधरी
कलावंत विनय पाठक, मुग्धा गोडसे, रायमा सेन, सौरभ शुक्ला
श्रेणी कॉमेडी ड्रामा

गुरुदत्तचा 'कागज के फूल' हा क्लासिक चित्रपट सर्वांना माहिती आहे. त्याच नावाशी साधर्म्य असणारा ‘कागज के फूल्स’ पडद्यावर झळकला आहे. फारशी आकर्षक नामावली नसणाऱ्या हा ताजा 'कागज के फूल्स', गुरुदत्तच्या ‘कागज के फूल’ पेक्षा वेगळा आहे. जुन्यातून नवी प्रेरणा घेऊन हा तयार करण्यात आला आहे. विनोदी अंगाने समाजातील उणिवांवर, कौटुंबिक नातेसंबंधावर, साहित्य विश्वातील बरबटलेल्या व्यवस्थेवर भाष्य करणारा ‘कागज के फूल्स’ मध्ये बऱ्याचदा प्रेक्षकांना एप्रिल फूल मिळते. नव्या दमाचा अनअनुभवी दिग्दर्शक अनिल कुमार चौधरी अजून बऱ्याच इयत्ता उत्तीर्ण होण्याची गरज प्रत्येक फ्रेमगणिक जाणवते. विषय चांगला असला तरी त्याची उथळ मांडणी प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात अपयशी ठरते. आपण चित्रपटगृहात येऊन हा ‘फूल’पणा का केला याची जाणीव प्रेक्षकाला सातत्याने बोचत राहते.
विनय पाठक याच्यावर मुख्य भूमिकेची धूरा आहे. त्याने पुरुषोतत्म त्रिपाठी ही व्यक्तीरेखा रंगवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मात्र पटकथाच ढिसाळ असल्याने त्याच्याशिवाय दोन्ही नायिका मुग्धा गोडसे आणि रायमा सेन यांनाही आपल्याला सहन करावे लागते. तसे पाहिले तत्वांशी प्रामाणिक असलेला लेखक, त्याची ‘ओव्हर अँम्बीशियस’ पत्नी, त्यांच्यातील नाते संबंध, त्यातून उडणारे खटके, सातत्याने टोचणी, या सर्वाला वैतागून घरापासून दूर गेल्यानंतर त्याला भेटणारी कॉलगर्ल, तिचे चांगुलपण, त्याचवेळी समाजातील विविध अंगांवर केलेले भाष्य असा जोरदार बेस असताना मांडणी फसते.
कथा :
पुरुषोत्तम त्रिपाठी (विनय पाठक) एक लेखक. निक्की (मुग्धा गोडसे) त्याची महात्वाकांक्षी पत्नी. आपल्या पतीने मोठे नाव, पैसा कमवावा ही निक्कीची इच्छा. त्यातून दोघांची सातत्याने भांडणे. तो घर सोडून जातो. रुवीना (रायमा सेन) ही कॉलगर्ल त्याला सहारा देते. प्रकाशकाला हवे तसे बदल करून रुवीना त्याचे पुस्तक बाजारात आणते. ते त्याला पसंत पडत नाही. तो घरी परततो, पुन्हा सर्व काही पहिल्यासारखे सुरू होते…
पुढे वाचा उर्वरित रिव्ह्यू...