आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Movie Review Of Kareena Kapoor And Arjun Kapoor Starer Ki & Ka

Movie Review : नव्या दमाचा जबरदस्त अंदाज ‘की अॅण्ड का’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमाकी अॅण्ड का
रेटिंग3/5
कलाकारअर्जुन कपूर, करीना कपूर, स्वरूप संपत, रजत कपूर, अमिताभ आणि जया बच्चन
दिग्दर्शकआर. बाल्की
संगीतइलियाराजा
पटकथाआर बाल्की
श्रेणीसामाजिकपट
'चिनी कम', 'पा' आणि 'शामिताभ' यासारखे प्रत्येक वयोगटाच्या प्रेक्षकाला दखल घ्यायला लावणारे हे चित्रपट बनवणाऱ्या आर बाल्की यांचा ‘की अॅण्ड का’ हा एक जबरदस्त चित्रपट आहे. वेगळा विषय कौशल्याने मांडण्याची त्यांची हातोटी पुन्हा एकदा सिद्ध झाली. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे असे म्हटले जाते याचा अनुभव बाल्कींचा हा चित्रपट पाहता येतो. चौकटीबाहेर जात अजुर्न कपूरने केलेली भूमिका त्याच्या करिअरमध्ये महत्त्वपुर्ण ठरेल तर करीना नेहमीप्रमाणे दिसली. चित्रपटात अमिताभ आणि जया बच्चन हे सुखद धक्का देतात.
हिंदी चित्रपटसृष्टीत बडे बडे दिग्दर्शक निर्माते अंधश्रद्धा पाळतात, याचा अनुभवही यात येतो. करण जोहरचा चित्रपट हिट व्हायचा असेल तर त्यात काजोल दिसलीच पाहिजे तसेच आर बाल्कींच्या चित्रपटात अमिताभ बच्चन हे लकी चार्म आहेत.

अतिशय वेगळा पण बदलत्या काळाला सर्मपक विषय घेतल्याने चित्रपटाबाबत पुर्वीपासून उत्सुकता होती. अर्जुनचे आतापर्यंतचे करिअर पाहता त्याच्याकडून फारशा अपेक्षा नव्हत्या, पण त्याला छेद देत त्याने प्रेक्षकांना चकीत केले आहे. आजच्या काळात प्रत्येक महत्त्वाकांक्षी आणि सक्षम महिलेला हवा हवासा वाटावा असा नवरा त्याने साकारला आहे.
भारतीय कुटूंब व्यवस्थेत पैसे कमवणाऱ्यालाच सर्वाधिक ग्लॅमर मिळते. घर सांभाळणाऱ्यांना कायम दुय्यम दर्जा मिळतो. श्रमाच्या विभाजनावरून व्यक्तीचे महत्त्व ठरते. घर सांभाळणे ही एक कला आहे. महिलांनी घर सांभाळणे म्हणजेच त्या बिनमहत्त्वाचे काम करतात असा सर्वमान्य समज आहे. तर कमवत्या महिलांना थोडी अधिक किंमत मिळून जाते. पण कुटूंबाचा बॅकबोन पुरुषही असू शकतो. घर सांभाळणे हे फक्त महिलांचे काम नाही, यावर चित्रपटात प्रकर्षाने भाष्य केले आहे. घर आणि नोकरी करणे दोन्ही समान महत्त्व असलेल्या गोष्टी आहेत हे यामध्ये पटवून दिले आहे. स्त्री-पुरूषाने आपल्या आवडीनुसार सोयीनुसार काम निवडले. पण कुणाचेही काम कमी किंवा जास्त् नाही. आगामी काळात पुरुषांनी हाऊस हसबंड होणे काही गैर नाही असा संदेश यामध्ये देण्यात आला आहे.
पुढे वाचा, कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन आणि संगीताविषयी...