सिनेमाचे नाव | मिस्टर एक्स |
क्रिटिक रेटिंग | 2.5/5 |
कलाकार | इमरान हाश्मी, अमायरा दस्तूर, अरुणोद्य सिंह |
दिग्दर्शक | विक्रम भट |
निर्माते | मुकेश भट, महेश भट |
संगीत | जीत गांगुली, अंकित तिवारी |
श्रेणी | सायन्स फिक्शन |
दिग्दर्शक विक्रम भट यांचा 'मिस्टर एक्स' हा साय-फाय थ्रिलर सिनेमा आज थिएटरमध्ये दाखल झाला आहे. खरं तर इमरानची इमेज ही सीरिअल किसर म्हणून आहे. मात्र या सिनेमात इमरान प्रेक्षकांना अगदी वेगळ्या अंदाजात दिसतोय. इमरानचा हा सिनेमा कौटुंबिक सिनेमा आहे.
कथा
'मिस्टर एक्स' या सिनेमाची कथा ही रघुराम राठौर (इमरान हाश्मी) या व्यक्तीची आहे. हा दहशतवादी स्कॉटचा सदस्य आहे. एकेदिवशी रघू वेगवेगळे प्रयोग करणा-या फार्मास्युटिकल कंपनीत पोहोचतो. येथे त्याला एक औषध खायला दिले जाते. हे औषध खाल्याने त्याचा मृत्यू होत नाही. मात्र तो जगातून अदृश्य होऊन जातो. अदृश्य झाल्यानंतर त्याला नाव मिळतं, मिस्टर एक्स. सिनेमातील दोन संवाद अतिशय महत्त्वाचे आहे. यावरुन पुढील कथा काय असेल, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. पहिला संवाद म्हणजे, 'मैं मरा नहीं हूं....कोई वजह है, जिसके लिए मैं अब भी जिंदा हूं" आणि दुसरा संवाद आगे, 'मैं वो रघुराम राठौर नहीं हूं, जो कानून के दायरे में रहकर नाइंसाफी बर्दास्त करेगा.. मैं वो मिस्टर एक्स' हूं, जो कानून तोड़कर इंसाफ करेगा।" आता सिनेमाच्या कथानकात रघुचा मृत्यू होतो का? मिस्टर एक्स बनून तो लोकांना कसा न्याय मिळवून देतो? हे बघण्यासाठी तुम्हाला थिएटरकडे वळावे लागेल.
दिग्दर्शन
विक्रम भट यांचे दिग्दर्शन ठिकठाक आहे. सिनेमात अधिक प्रमाणात व्हिज्युअल इफेक्ट्सचा उपयोग करण्यात आला आहे. या सिनेमाचे VFX भारतातच तयार करण्यात आले आहेत.
पुढे वाचा, उर्वरित रिव्ह्यू...