आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: मुन्नाच्या डान्सिंग स्ट्रगलची कहाणी आहे 'मुन्ना मायकल'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
चित्रपट मुन्ना माइकल
रेटिंग
3 /5
स्टार कास्ट टायगर श्रॉफ, नवाजुद्दीन सिद्दीकी, निधी अग्रवाल, चेतना पांडे, रोनित रॉय, अमीषा पटेल, सना सईद, जीवा, तनिशा मुखर्जी, जॉनी लिवर
दिग्दर्शक शब्बीर खान
संगीत तनिष्क बागची आणि मीत ब्रदर्स
निर्माते विकी रजानी आणि सुनील लुल्ला
कथा अमाल किंग 
श्रेणी नाटयपट
 
 
नृत्याभोवती फिरणारी मुन्ना मायकल ही एक भरकटलेली कथा आहे, मात्र नवाजुद्दीन सिद्धीकीसारख्या तगड्या कलावंतांने आपल्या शैलीने प्रेकक्षकांना शेवटपर्यंत बांधून ठेवले आहे. याखेरीज निधी अग्रवाल या चुणचूणीत नव्या चेहऱ्यावर नजरा खिळतात. निधी अन् नवाजुद्दीन यांच्या उत्तम अभिनयामुळे या चित्रपटाला आधार मिळाला आहे.
 
चित्रपटाच्या नावातच चित्रपटाचा गाभा स्पष्ट होतो. नृत्याचा बेताज बादशहा असलेल्या मायकल जॅक्सनवरुन प्रेरणा घेत हा चित्रपट लिहिण्यात आला आहे. मात्र, नृत्याभोवती चित्रपट बांधता आला नाही. नृत्याला वरवरचा स्पर्श करण्यात आला आहे. असे असले तरीही टायगरने केलेले प्रत्येक नृत्य आणि त्याची प्रत्येक अदा प्रेक्षकांना तरुणाईच्या शिट्या मिळवणारी आहेत.
 
टायगरनेही पर्दापणापासून स्वत: केलेले बदल त्याला उमदा अभिनेता म्हणून स्थिरावणारे असले तरीही त्याने हृदयाला भिडावा असे अभिनय आत्मसात करण्याची अजुनही आवश्यकता आहेच. 
अमाल किंग याने लिहिलेल्या या कथेत नृत्य, बाप-लेकाचे नाते, महत्त्वाकांक्षी गुंड आणि प्रेम असे अनेक धागे गुंफण्यात आले आहेत. मात्र, यातून सुंदर वीण तयार होण्याऐवजी नुसताच गुंता झाला आहे. गँगस्टर, पोलिस अधिकारी, पत्रकार, पिता अशा विविधांगी पण अगदी लहान भूमिकांतूनही प्रेक्षकांचे लक्ष वेधणारा नवाजुद्दीन आता प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात कल्ला करतात. नायका इतकाच किंबहुना त्याहून अधिक भाव नवाजुद्दीन खातो. त्याच्या नुसत्या एन्ट्रीवर चित्रपटगृह दणाणून जाते. रंगमंचावर तयार झालेला हा अभिनेता प्रत्येक भूमिका ताकदीने निभावतो याची प्रचिती वारंवार येते ती इथेही दिसून येते. महेंदर फौजी या डॉनची विनोदी भूमिका त्याने या चित्रपटात केली आहे. नवाजला नृत्य करताना पाहणे हा एक मनोरंजक अनुभव आहे. 

शब्बीर खान यांना कथा निवडण्याचे कौशल्य जमले नसले तरीही पटकथा मात्र अचूक आहे. चित्रीकरणही चांगले झाले आहे. याशिवाय नृत्यदिग्दर्शन उत्तम झाले आहे. या चित्रपटातील गाणी नक्कीच तरुणाईला भावणारी आहेत, याचे श्रेय नृत्यांना आहे. 35 मिनिटांची एकुण 10 गाणी चित्रपटात आहेत, यातील फक्त एक गाणे विनानृत्याचे आहे. 
 
पुढे वाचा, काय आहे या चित्रपटाची कथा आणि बरंच काही...
बातम्या आणखी आहेत...