आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : आईसाठी भिकारी झालेल्या त्यागी मुलाची गोष्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट  भिकारी
रेटिंग 3 स्टार
कलावंत स्वप्नील जोशी, ऋचा इनामदार, किर्ती आडारकर, पद्मश्री कदम, गुरु ठाकूर, सयाजी शिंदे, आशा, नारायण जाधव, कैलाश वाघमारे, शुभांगी भुजबळ, मिलिंद शिंदे, प्रदीप कबरे, जयंत गाडेकर, माधव अभ्यंकर, पार्थ आचरेकर
दिग्दर्शक  गणेश आचार्य
निर्माता मी मराठा फिल्म प्रॉडक्शनचे शरद देवराम शेलार, गणेश आचार्य
कथा, पटकथा , संवाद  गुरु ठाकूर
संगीत मिलिंद वामखेडेकर , विशाल मिश्रा
श्रेणी फॅमिली ड्रामा
 
'पिचैक्करन' हा तामिळ भाषेत २०१६ साली निघालेला चित्रपट. शशि याने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात विजय अँटनी हा नायक होता. 'पिचैक्करन' हा चित्रपट ४ मार्च २०१६ रोजी प्रदर्शित झाला व त्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. 'पिचैक्करन' या तामिळी चित्रपटाचे तेलगूमध्येही डबिंग झाले होते. त्या तेलुगु चित्रपटाचे नाव होते `बिचागडु'. हा चित्रपट १३ मे २०१६ रोजी प्रदर्शित झाला. त्यालाही बरे यश मिळाले. त्यामुळे 'पिचैक्करन'चे हिंदीमध्ये डबिंग करण्यात आले व तो २०१७च्या प्रारंभी 'रोडसाइड रावडी' या नावाने प्रदर्शित करण्यात आला. या हिंदी अवताराला फार यश मिळाले नव्हते. त्यानंतर ओडिया भाषेमध्ये हाच चित्रपट 'बेबी' नावाने प्रदर्शित झाला. त्यात अनुभव मोहंती याने नायकाची भूमिका केली होती. 'पिचैक्करन'च्या या चार भाषांतील प्रवासानंतर हा चित्रपट मराठी भाषेचीही पायरी चढला. 'पिचैक्करन' हा मराठीत डब केला गेलेला नाही. तर 'पिचैक्करन'च्या कथेचा गाभा घेऊन 'भिकारी' या नावाने मराठीत हा चित्रपट बनविण्यात आला. या चित्रपटाचा नायक आहे स्वप्नील जोशी. दाक्षिणात्य व मराठी चित्रपटांमध्ये अनेकदा कथा, संकल्पना यांची देवाणघेवाण झाली आहे. 'भिकारी' हा चित्रपट त्यातीलच एक टप्पा आहे पण तो मैलाचा दगड मात्र नाही.
 
पुढे वाचा, काय आहे चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय, गणेश आचार्य यांचे दिग्दर्शन आणि संगीत... 
 
बातम्या आणखी आहेत...