Home »Reviews »Movie Review» Movie Review OF Marathi Film Hrudayantar

MOVIE REVIEW : हृदयस्पर्शी 'हृदयांतर'

समीर परांजपे | Jul 06, 2017, 18:19 PM IST

चित्रपटहृदयांतर
रेटिंग4.5 स्टार
कलावंतसुबोध भावे, मुक्ता बर्वे, अतुल परचुरे, मीना नाईक, तृष्णिका शिंदे, निष्ठा वैद्य, सोनल खरे, मेहेर आचरिया, विशाखा सुभेदार, अमोल बावडेकर
कथा, दिग्दर्शकविक्रम फडणीस
निर्मातायंग बेरी एन्टरटेन्मेन्ट, इम्तियाझ खत्री, विक्रम फडणीस प्रॉडक्शन
संवादरोहिणी निनावे
संगीत दिग्दर्शकप्रफुल कार्लेकर
श्रेणीकौटुंबिक चित्रपट
`आनंद मरा नही, आनंद कभी मरते नही' हा संवाद नेहमी आठवत राहातो जेव्हा जेव्हा 'आनंद' चित्रपटाची आठवण होते. लिम्फोमा म्हणजे आतड्याचा दुर्मिळ प्रकारचा कर्करोग झालेला नायक म्हणजे आनंद. दु:खाची सावली मनावर चुकूनही पडू न देता तो आपले उरलेसुरले आयुष्य ज्या आनंदात घालवतो व इतरांना आनंदी ठेवतो ते स्नेहक्षण दाखविणारा हा चित्रपट. 'आनंदची' याद पुढे शाहरुखच्या 'कल हो ना हो' या चित्रपटाने वेगळ्या प्रकारे दिली. त्यातील शाहरुखने साकारलेला अमन हा नायक हृदयविकाराने ग्रस्त असतो. तोही फार जगणार नसतो. पण तोही साऱ्यांना सरतेशेवटी आनंदच देऊन जातो. यासारख्या चित्रपटांची प्रेरणा घेऊन नव्हे तर कुठेतरी नाळ जु‌ळत असलेली कथा आहे ती म्हणजे 'हृदयांतर' चित्रपटाची. इथे रक्ताचा कर्करोगाने ग्रस्त आहे अकरा वर्षांची एक मुलगी नित्या. तिला आनंद देण्यासाठी तिचे आई-बाबा, लहान बहीण व सगेसोयरे जी धडपड करतात त्याची कथा 'हृदयांतर' चित्रपटात मांडणी आहे. MOVIE REVIEW : 'कंडिशन्स अॅप्लाय' नातेसंबंधांची 'तरुण' कहाणी
काय आहे या चित्रपटाची कथा, कसा झाला आहे कलाकारांचा अभिनय, विक्रम फडणीस यांचा मराठी सिनेमासाठीचा दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न, यासह वाचा बरंच काही पुढील स्लाईड्सवर...

Next Article

Recommended