आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : \'ती आणि इतर\' अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी कथा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
 
चित्रपट ती आणि इतर
रेटिंग 3 स्टार
कलावंत सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, अविष्कार दारव्हेकर, भुषण प्रधान, प्रिया मराठे, सुमन पटेल, गणेश यादव
कथा/ संवाद शांता गोखले
दिग्दर्शन गोविंद निहलानी
संगीत वसुदा शर्मा
निर्मिते प्रकाश तिवारी, पुनीत सिंह, दयाल निहलानी, धनंजय सिंह
श्रेणी फॅमिली ड्रामा
 
अर्धसत्य, आक्रोश, द्रोहकाल यासारखे वास्तववादी विषय आपल्या चित्रपटांद्वारे मांडणारे प्रगल्भ दिग्दर्शक गोविंद निहलानी हे 'ती आणि इतर' हा आपला पहिलावहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित करणार असल्यामुळे सर्वांनाच उत्सुकता होती. निहलानी यांनी दिग्दर्शित केलेली तमस ही दुरचित्रवाहिनीवरील मालिका देखील समाजाचे वास्तव दाखविणारी होती. लेखिका मंजुळा पद्मनाभन यांच्या इंग्रजी नाटक 'लाईटस् आऊट'वर 'ती आणि इतर' हा मराठी चित्रपट आधारलेला आहे. 

गोविंद निहलानी यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला विजय तेंडुलकरांच्या शांतता कोर्ट चालू आहे या चित्रपटासाठी कॅमेरामन म्हणून काम केले होते. त्यानंतर तब्बल ४५ वर्षांनी निहलानी 'ती आणि इतर'च्या निमित्ताने पुन्हा मराठी चित्रपटसृष्टीशी संलग्न झाले आहेत. हा चित्रपट केल्यानंतरचा तुमचा पुढचा प्रकल्प काय असेल असे प्रसारमाध्यमांनी विचारल्यावर गोविंद निहलानी म्हणाले की, यापुढे मला अजून एखादा मराठी चित्रपट करायला आवडेल. हे सगळे लक्षात घेऊनच प्रेक्षक `ती आणि इतर' चित्रपट बघायला जाणार आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, चित्रपटाची कथा, दिग्दर्शन याबाबत...
 
 
बातम्या आणखी आहेत...