आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : मार्गरिटाच्या सोळाव्या वर्षाला सलाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शारीरिक कमजोरीसह जन्मलेल्या लोकांचे जीवन आणि विचाराच्या आतापर्यंतच्या स्पर्श केलेल्या पैलूवर हा चित्रपट प्रकाश टाकतो. हा पैलू त्यांच्या मनात जागृत होणाऱ्या लैंगिक संबंधाच्या इच्छांचा आहे. सामान्य माणसाच्या अशा प्रकारच्या इच्छांना नैसर्गिक मानले जाते तेव्हा कमजोरीचे शिकार असलेल्या लोकांमध्ये याला अनैसर्गिक का मानले जावे? कारण लैंगिक संबंधाची इच्छा मानवी मनात जागृत होते आणि शारीरिक अपंगत्वाचा याच्याशी कोणताच संबंध नाही. खरे म्हणजे तथाकथितरीत्या सामान्य माणसांच्या मनात शारीरिक किंवा मानसिक कमजोरी असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत जी अपूर्ण माहिती आणि संवेदनहीनता आहे, त्याला त्यांचे अपंगत्व मानले गेले पाहिजे. ही त्यांची मानसिक हिंसा आणि अपंगत्व आहे, ज्यामुळे बलात्कारासारखे गंभीर गुन्हे घडतात.
या चित्रपटाची सोळा वर्षीय नायिका मार्गरिटाला जन्मावेळी पुरेसा ऑक्सिजन मिळाल्यामुळे तिच्या मेंदूत केमिकल लोचा झाला आहे. तसेच तिच्या शरीराचे काही अवयव आडवे-तिरपे झाले आहेत आणि या वाकडेपणावर तिचे नियंत्रण राहत नाही. मात्र, मनामध्ये सर्व सामान्य इच्छा जागृत होतात. तिच्या हृदयामध्ये इच्छा आणि असहायतेची ओढाताण नेहमीच चालत राहते आणि या 'मिक्सी'मध्ये स्वप्नांचा चुराडा होतो. हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. सामान्य म्हणवले जाणारे लोकही लैंगिक संबंधाच्या सूक्ष्म विश्वात आपल्या जन्मजात कमजोरीमुळे घायाळच राहतात. या क्षेत्रामध्ये निसर्ग महिलेच्या बाबतीत उदार आणि पुरुषांच्या बाबतीत किंचित कंजूष राहिला आहे. त्यामुळे पुरुष महिलेविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे षडयंत्र आणि भ्रम रचतो. म्हणून अपंगत्व व्यापक आहे, पण त्याकडे लक्ष केवळ त्याच क्षेत्रांमध्ये दिले जाते जिथे ते शारीरिक कमजोरीच्या लक्षणांसह सादर आहे. मात्र, अनेक सामान्य म्हणवल्या जाणाऱ्या लोकांची भयावह कमजोरी अदृश्यच राहते आणि हाच मनुष्यामध्ये लपलेला अदृश्य 'मिस्टर एक्स' गुन्हा करतो.
शोनाली बोस यांच्या चित्रपटामध्ये मार्गरिटाला इंटरनेटवर अश्लील चित्रपट पाहताना तिची आई पकडते तेव्हा त्यांच्यात वाद होतो. आई इच्छा विश्वाला स्वीकारत नाही. मुलीला अपंगत्व असतानाही त्या विश्वाची माहिती जाणून घ्यायची आहे. अनेकदा सामान्य युवती अशा वादात दरवाजा बंद करून एकांत वातावरणाचा आधार घेते. परंतु बिचारी मार्गरिटा तर हेदेखील करू शकत नाही. दरवाजावरून आठवते मेहबूब खान यांची अमर कृती 'मदर इंडिया'मध्ये हात कापलेला राजकुमार दरवाजावरील आवाज ऐकून दरवाजा उघडण्यासाठी धावतो. क्षणभरासाठी तो विसरतो की, त्याचे हात कापलेले आहेत. याला वैद्यकीय भाषेत 'फँटम लिम्ब' असे म्हणतात. अवयव कापल्यानंतरही मानवी मन ज्या क्षणी त्या वास्तवाला विसरतो त्या क्षणामध्ये तो 'फँटम लिम्ब'ने पीडित होतो.
काही दिवसांपूर्वीच 'जिंदगी' चॅनेलवर एका आंधळ्या आणि अर्धवट चेहरा जळालेल्या तरुणीचे आपल्या संगीत शिक्षकावर प्रेम जडते, लग्नही ठरते. एकेदिवशी हार्मोनियमच्या जवळ ठेवलेल्या लाकडाच्या पायाला जेव्हा ती स्पर्श करते तेव्हा तिला कळते की, भावी पतीला एक पाय नाही. या प्रकरणामध्ये तिला कळते की, तिच्या चेहऱ्याच्या होरपळलेल्या भागाची जाणीव तिच्या आईने तिला होऊ दिली नाही. आई नेहमीच तिला सुंदर म्हणायची, जेणेकरून तिचे अंधत्वाचे दु:ख कमी होईल. आता ती अपंग पतीच्या प्रेमाला समजू शकते. अनेकदा कमजोरींवर पडदा टाकून मनुष्य भ्रम कायम ठेवतो. कदाचित जीवनात वास्तवाच्या डोळ्यांत डोळे घालून पाहण्याच्या ताकदीप्रमाणेच काही भ्रम पाळण्याचीदेखील गरज आहे.
आजच्या काळातील आई-वडिलांनी हे जाणले पाहिजे की, त्यांची सामान्य मुल इंटरनेटवर काय पाहत आहेत. वस्तुत: सोळावे वर्ष आयुष्याच्या पहाटेचा काळ आहे, कवितेचा काळ आहे. या वयाच्या तिन्ही सांजेच्या अंधाराकडे संवेदनेने पाहा. शोनाली बोसला सलाम, मार्गरिटाला सलाम.