आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Movie Review: \'मोहेंजो दारो\' : पैसा वसूल होतोच; पण सिंधू संस्‍कृतीही उलगडते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिटिक रेटिंग 4/5
स्टार कास्ट ऋतिक रोशन, कबीर बेदी, पूजा हेगडे, किशोरी शहाणे, नितीश भरद्वाज, रुणोदय सिंग, सुहासिनी मुळे
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर
कथा /संवाद प्रीती ममगेन
संगीत ए. आर. रहेमान
जॉनर नाट्यपट
जगातील प्राचिन संस्‍कृतीपैकी एक असलेल्‍या सिंधू संस्‍कृतीचा ऱ्हास कसा झाला, तिची लिपी, भाषा कोणती होती याचा अद्यापही उलगडा झाला नाही. पण, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी 'मोहेंजो दारो' या चित्रपटातून हा इतिहास उलगडण्‍याचा प्रयत्‍न केला. तो पूर्णत: काल्‍पनिक असला तरीही त्‍यातून पाच हजार वर्षांपूर्वीचे प्रगत शहर मोहेंजो दारो कसे होते ? त्‍या काळचे राहिणीमान, याची कल्‍पना प्रेक्षक करू शकतात. या चित्रपटातून केवळ मनोरंजनच होते असे नाही तर त्‍यातून सिंधू संस्‍कृतीचा इतिहास उलगडतो. शिवाय विकास आणि शहरीकरणाच्‍या नावाखाली निसर्गावर मात केल्‍यानंतर काय होऊ शकते, याचा संदेशही यातून मिळतो.
काय आहे चित्रपटाचे कथानक ?
शरमन नावाचा एक तरुण आपल्‍या काका आणि काकूसोबत आमीड गावात राहत असतो. हे कुटुंब निळीची शेती करत असते. काका - काकूचा प्राणप्रिय असलेला शरमन खूप मेहनती असतो. मात्र, आपण पिकवलेल्‍या मालाला योग्‍य भाव मिळत नसल्‍याची चीडही त्‍याला असते. त्‍यातूनच त्‍याच्‍यात उंच - उंच डोंगरापलीकडे असलेल्‍या मोहेंजोदारो या शहरातील बाजारपेठेत जाऊन आपला माल स्‍वत: विकण्‍याची महत्‍त्‍वकांक्षा वाढते. तो आपल्‍या काकाला त्‍याबद्दल बोलूनही दाखवतो. पण, त्‍या शहरात माणुसकीच नाही असे सांगून त्‍याचे काका त्‍याला तिथे पाठवण्‍याचे टाळत राहतात. शरमन आपल्‍या काकाचे न ऐकता आपल्‍या मित्राला सोबत घेऊन मोहजो दारोला जाण्‍याची तयारी करतो. मग काकाही त्‍याला परवानगी देतात. मोहेंजोदारोमध्ये गेल्‍यानंतर तेथील माहम नावाचा प्रधान शेतकऱ्यांची, रहिवाशांची पिळवणूक करतो. हे पाहून शरमनचे संवेदनशील मन अधिकच संवेदनशील होते आणि तो परत जाण्‍याचा विचार करतो. याच वेळी त्‍याला चानी दिसते. पाहता क्षणीच तो तिच्‍या प्रेमात पडतो. त्‍यानंतर त्‍याचा परत जाण्‍याचा निर्णय बदलतो. पण, प्रधानाचा मुलगा मुंजा याच्‍यासोबत चानीचे बालपणीच लग्‍न ठरलेले असते. मुंजाही आपल्‍या वडिलांप्रमाणे दृष्‍ट असतो. तरीही चानी आणि शरमनची प्रेम कहानी कशी फुलते, त्‍यांचा विवाह होतो का ? तो प्रधानाविरोधात कसा बंड करतो ? या सर्वांचे उत्‍तरं चित्रपट पाहिल्‍यानंतरच मिळतील.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, चित्रपट का पाहावा आणि का पाहू नये...
बातम्या आणखी आहेत...