आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOVIE REVIEW : पाशबंध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुखी संसाराची स्वप्न अनेकजणी पाहतात. मात्र सुखी संसार सगळ्याच जणींच्या वाट्याला येत नाही. काहींना अक्षरश: परितक्त्यांच जीवन जगावं लागतं. महानगरांमध्ये जरी नेहमीच महिला सक्षमीकरणाविषयी बोललं जातं असलं तरीही गावांमध्ये परिस्थिती वेगळी आहे. तिथली स्त्री आजही पुरूषी अहंकाराला आणि अत्याचाराला बळी पडते. हेच कुठेतरी अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केलाय, आपल्या ‘पाशबंध’ या चित्रपटातून दिग्दर्शक आनंदराम यांनी.
‘पाशबंध’ ही सत्यघटनेवर आधारित फिल्म आहे. आणि हे दाहक वास्तव सिल्व्हर स्क्रिनवर घेऊन येणा-या दिग्दर्शक आनंदराम यांनीच चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन केलंय. ब-याचदा दिग्दर्शकाने अशा चारही जबाबदा-या स्विकारल्यावर ते कथानक प्रेक्षकांच्या हृदयाला अधिक परिणामकारकतेने भिडण्यास मदत होते असं म्हणतात. मात्र तशी परिस्थिती काही 'पाशबंध' पाहताना जाणवत नाही. उलट पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शनातल्या अनेक त्रुटी सातत्याने चित्रपट पाहताना जाणवत राहतात. जी गोष्ट दिग्दर्शनाची तिच गोष्ट छायांकन आणि संकलनाचीही.
अभिनेत्री नंदिता धुरी सोडली तर इतर सहकलाकारांचे अभिनय अतिशय नाटकी आणि बेगडी वाटतात. जरी नंदिता मुख्य भुमिकेत असली तरीही तिच्या एकटीच्या बळावर ह्या त्रुटी असताना चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडण्यास असफल ठरतो.
खरं तर धुळ्यातली 30 वर्षांपुर्वीची सत्यघटना म्हटल्यावर या चित्रपटाची तुलना रिलीज अगोदर सिंधुताई सकपाळ या चित्रपटाशीही काहींनी केली होते. पण ही तुलना करण्याचा विचार करणंच किती मुर्खपणाचं असल्याचं, हा चित्रपट पाहताना जाणवतं.