आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : समाजाला महत्त्वाचा संदेश देतो \'फूल्लू\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
रेटिंग 2.5 /5
कलाकार शारिब अली हाशमी, ज्योति सेठी, नूतन सूर्या
दिग्दर्शक अभिषेक सक्सेना   
निर्माता पुष्पा चौधरी,  अनमोल कपूर,  क्षितिज चौधरी ,रमन कपूर
संगीत विकी अग्रवाल
जॉनर  सोशल  ड्रामा   
 
दिग्दर्शक अभिषेक सक्सेना यांनी महिलांच्या एका महत्त्वाच्या समस्येवर प्रकाश टाकण्याचे काम केले आहे. यासाठी त्यांनी अनेकविध उदाहरणांचा उपयोग केला आहे. 
 
कथा 
ही कथा आहे एका ग्रामीण भागात राहणाऱ्या फूल्लू म्हणजेच (शारिब अली हाश्मी)ची जो त्याच्या एका कृतीमुळे पूर्ण गावात चर्चेचा विषय बनतो. तो तसा काही काम करत नाही पण गावातून शहरात गेल्यानंतर तो गावातील महिलांसाठी गरजेचे सामान आणत असतो आणि त्यासाठी कोणाकडून पैसेही घेत नाही. फूल्लू काही काम करत नसल्याने त्याची आई फार दुःखी असते आणि त्याला जबाबदारी समजावी म्हणून त्याचे लग्न लावून देते. यानंतर फूल्लूचे लग्न होते आणि त्याची बायको बिगनी( ज्योति सेठी) घरी येते. आता फूल्लूच्या घरात तीन महिला होतात त्याची आई, बहीण आणि बायको.  एक दिवस फूल्लू शहरात जातो तिथे तो पहिल्यांदा सॅनिटरी नॅपकिन पाहतो. ते पाहून त्याला फार आश्चर्य वाटते आणि त्याच्या घरातील स्त्रियांसाठी तो ते विकत घेतो. त्याची आई त्याला त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी पॅड घेण्याचे पैसे देते पण तो त्यातून गावातल्या स्त्रियांसाठी पॅड घेऊन येतो. त्याची आई त्याला फार समजावते पण तो ऐकत नाही आणि गावातल्या स्त्रियांसाठी कमी पैशांत पॅड बनविण्याचे ठरवितो. यानंतर  तो शहरात जाऊन स्वतः पॅड बनविण्याचे शिकतो आणि गावात येऊन त्याच्या हाताने बनविण्याचे काम सुरु करतो. त्याने बनविलेले पहिले पॅड तो त्याच्या आईला आणि बहिणीला चेक करण्यासाठी देतो पण त्या दोघीही त्याला नकार देतात आणि घरातून बाहेर हाकलतात. आपल्या गर्भवती पत्नीलाही तो मदत मागतो पण परिस्थिती बदलते आणि या सर्वांचा सामना फूल्लू कसा करतो हे जाणून घेण्यासाठी आपल्याला चित्रपट पाहावा लागेल. 
 
दिग्दर्शन 
चित्रपटाचे दिग्दर्शन उत्तमप्रकारे करण्यात आले आहे. चित्रपट सिनेमॅटोग्राफी आणि लोकेशन्सच्याबाबतीत उजवा ठरतो.
 
पुढील स्लाईडवर पाहा, कशी आहे चित्रपटांची कथा, अभिनय आणि इतर गोष्टी..
बातम्या आणखी आहेत...