आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MOVIE REVIEW : प्राइमटाइम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल ‘प्राइमटाइम’ हा शब्द जनमानसात खूप प्रसिध्द झालाय. प्राइमटाइम म्हणजे खरं तर बहूतेक प्रेक्षक जेव्हा टीव्हीसमोर जास्त वेळ घालवतात ती वेळ... पण गेल्या काही वर्षात घरातल्या गृहिणी जेव्हा टीव्हीसमोर बसतात, तो टीव्हीचा प्राइमटाइम होऊन बसलाय. त्यामुळे संध्याकाळचा प्राइटमटाइम आजकाल फक्त संध्याकाळीच नाही तर दुपारीही असतो. रिमोट कंट्रोल बहूतेक घरांमध्ये या काळात गृहिणींच्याच हातात असतो आणि त्यामुळे त्यांच्या अभिरूचीच्याच टिव्ही मालिका टिव्हीवर पाहायला मिळतात. मालिका सुरू असताना डोळ्याची पापणीही न लवता मालिका पाहणा-या गृहिणींमुळे अर्थातच घरातले पुरूष आणि मुलं अक्षरश: हतबल होतात. मालिकेतल्या नायिकेसारखं दिसण्य़ासाठी तशा साड्या किंवा मंगळसूत्र घातलं जातं. हिच पार्श्वभूमी निर्माते हिमांशू पाटील आणि दिग्दर्शक प्रमोद कश्यप यांच्या ‘प्राइम टाइम’ या चित्रपटाची आहे.
चित्रपटाची नायिका वैशाली आपटेला मुंबई आणि मालिकांमधल्या हिरोइन्सच प्रचंड आकर्षण असतं. पण हे आकर्षण किती फसवं असतं. आणि मालिकांच्या नायिकांचं आयुष्य कसं असतं हे यातनं फिल्ममेकर्सनी दाखवल आहे. त्याचसोबत पालकांच्या अपेक्षांच ओझ वाहताना मुलांची काय परिस्थिती होते, ते दाखवण्याचा लेखक शुभ्रोज्योती गुहा यांचा प्रयत्न चांगला आहे. प्रशांत जामदार यांनी या चित्रपटाचे संवाद आणि गीतं लिहीली आहेत.
सुलेखा तळवलकर, मिलिंद शिंत्रे, निशा परुळेकर, किशोर प्रधान, अनुराग वरळीकर, कृतिका देव, स्वयंम जाधव या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. खरं तर, चित्रपटाची कथा चांगली आहे. मात्र त्याची मांडणी करताना चांगलीच फसगत झालेली जाणवते. संहिता चांगली असून किंवा सिनेमॅटोग्राफी चांगली असून भागत नाही. तर त्याच पोस्ट प्रॉडक्शनही अत्यंत महत्वाचं असतं. प्री-प्रॉडक्शनमध्ये जमलेली फिल्म पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये कुठेतरी फसलेली जाणवते. चित्रपटाच्या पहिल्या भागात निर्माण झालेल्या अपेक्षा इंटरव्हलनंतर सपशेल धुळीला मिळतात.
बातम्या आणखी आहेत...