आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOVIE REVIEW : क्षणभरही विलचित होऊ न देणारा जबरा ‘फॅन’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटफॅन
रेटिंग3.5/5
कलाकारशाहरूख खान, श्रिया पिळगावकर, दिपीका आमिन, योगेंद्र टिकू, सयानी गुप्ता, वलुश्वा डिसुजा
दिग्दर्शकमनिष शर्मा
संगीतविशाल शेखर
श्रेणीथ्रिलर
चाहते आणि सुपरस्टार हे कधीही न संपणार नातं आहे. याच विषयावर आधारलेला ‘फॅन’ हा शाहरूखच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट म्हणावा लागेल. सतत गुंतवून ठेवणारी कहानी प्रेक्षकांनाही फॅन करून जाते. गेल्या ५ वर्षांत अनेक मसालापटांत शाहरूख दिसला पण रसिकांच्या मनावर छाप टाकेल अशी एकही भूमिका त्याच्या वाट्याला आली नाही. मात्र, या चित्रपटातून शाहरुखची दुरावलेली फॅन फॉलोईंग पुन्हा त्याच्याकडे वळेल हे नक्की. १९९८ ला जुही चावला आणि सोनाली बेंद्रेसोबत केलेल्या 'ड्युप्लिकेट’ मध्ये तो डबल रोलमध्ये दिसला होता. त्यानंतर आज आलेला 'फॅन' त्याचा दुसरा डबल रोल असलेला चित्रपट ठरेल.

‘बॅण्ड बाजा बारात’ आणि ‘शुद्ध देसी रोमान्स’ सारख्या हिट चित्रपट देणाऱ्या मनिष शर्माने पहिल्यांदाच एका मोठ्या स्टारला घेऊन चित्रपट बनवला आहे. नवा विषय मांडण्याची त्याची हातोटी दाद देण्याजोगी आहे. 'बॅण्‍ड बाजा...'मध्ये अनुष्का आणि रणवीर या जोडीला तर ‘शुद्ध देसी’मध्ये सुशांतसिंग राजपूतला संधी दिली. दोन्ही विषय निराळे होते. तसाच 'फॅन'चा विषयही निराळा आहे. कलावंतांचे चाहते अनेक असतात. त्यांच्या मागे वेडे असलेल्या फॅन्सची संख्याही कमी नाही. पण, त्या वेडापायी टोकाला जात स्टारला आपल्यामागे पळवणारा हा फॅन विलक्षण झाला आहे. अशा फॅनची कहाणी पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर आली आहे. मुळात चित्रपटाचा विषय दमदार आहे. पटकथेची मांडणी चोखंदळपणे केली आहे. विशाल शेखरनी केलेल्या ‘हाय रे जबरा फॅन हो गया’ गाण्याने तर अधीच धूम केली आहे.

चित्रपटातून मनोरंजन करणे, मसाला तडका देण्यासोबत वेगळा विषय सहजतेने मांडणे हे कौशल्य दिग्दर्शकाला उत्तम जमले आहे. कारकिर्दीच्या या टप्यावर शाहरुखलाही एका हिटची गरज होतीच, ती यानिमित्ताने पुर्ण झाली आहे. यशराज बॅनरच्या ‘जब तक है जा’ नंतर हा त्याचा पहिला चित्रपट होता. समिकरण जुळून आल्याचे दिसतेय.
पुढे वाचा, आणखी काय आहेत सिनेमाची वैशिष्ट्ये, कसा झाला आहे कलाकारांचा अभिनय, संगीत आणि दिग्दर्शन...