Home | Reviews | Movie Review | Movie Review:Aligarh

Movie Review: उत्कृष्ट अभिनय आणि शानदार कथेने सजलाय 'अलीगढ'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 25, 2016, 10:32 AM IST

हा सिनेमा डॉ. श्रीनिवास रामचंद्र सिरासच्या आयुष्यावर आधारित आहे. ते अलीगढच्या यूनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होते.

 • Movie Review:Aligarh
  अलीगढच्या पोस्टरवर मनोज वाजपेयी आणि राजकुमार राव
  हा सिनेमा डॉ. श्रीनिवास रामचंद्र सिरासच्या आयुष्यावर आधारित आहे. ते अलीगढच्या यूनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होते. सिरास यांना त्यांच्या सेक्शुअल ओरिएंटेशनमुळे नोकरीवरून काढून टाकले होते. नंतर रहस्यमय स्थितीत त्यांचा मृत्यू झाला होता.

  क्रिटिक रेटिंग

  4/5

  स्टार कास्ट

  मनोज वाजपेयी, राजकुमार राव
  दिग्दर्शक हंसल मेहता
  निर्माता संदीप शर्मा
  संगीत दिग्दर्शक करण कुलकर्णी

  जॉनर

  बायोग्राफिकल ड्रामा
  पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कसा आहे सिनेमा...

 • Movie Review:Aligarh
  कथा...
  सिनेमात मनोज वाजपेयी यांनी प्रोफेसर सिरास यांची भूमिका साकारली आहे. जेव्हा सिरास एका पुरुषासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करताना कॉलेज स्टाफ पकडतो तेव्हा त्यांचे आयुष्य बदलते. या घटनेनंतर सिरास यांना नोकरीवरून काढले जाते आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी अपमान सहन करावा लागतो. या कठिण काळात त्यांचा आधार होतो पत्रकार दीपू (राजकुमार राव). तो या प्रकरणाची माहिती घेतो. यादरम्यान तो सिरासचा खास मित्र बनतो. 
   
  अभिनय...
  समलिंगी प्राध्यापकाच्या भूमिकेत मनोज वाजपेयीने पुन्हा एकदा सिध्द केले आहे, की तो एक उत्कृष्ट आहे. एका होमोसेक्शुअल व्यक्तीचे हावभाव, त्याचे दु:ख आणि आयुष्यातील गुंतागुंत मनोजने उत्तमरित्या पडद्यावर दाखवली आहे. आपल्या हक्काची लढाई लढता-लढता सिरास जेव्हा स्वत:ची मातृभाषा मराठीत बोलतात, तेव्हा मनोज बोलतोय, असे वाटतच नाही. 
  तरुण पत्रकार दीपूच्या भूमिकेत राजकुमार रावनेसुध्दा वेगळीच छाप सोडली. सिनेमात त्याला दाक्षिणात्य बॅकग्राऊंडमधून दाखवले आहे. त्यामध्ये त्याची मेहनत स्पष्ट दिसते. सिनेमात सिरासच्या वकीलाची भूमिका आशिष विद्यार्थीने केली आहे. त्याचा अभिनयसुध्दा उत्तम आहे. 
   
  दिग्दर्शन...
  'शाहिद' आणि 'सिटीलाइट'सारखे सिनेमे करणा-या हंसल मेहता यांनी या सिनेमातसुध्दा सिग्नेचर स्टाइल कायम ठेवली आहे. असे धाडसी सिनेमे करणारे हंसल प्रशंसेचे पात्र आहेत. सिनेमात एकच कमी आहे ती म्हणजे, सिनेमाची गती. जवळपास दोन तासांच्या या सिनेमाची लांबी आणखी कमी केली जाऊ शकत होती. सिनेमात अनेक सीन्स आहेत. जे काढता आले असते. विशेष म्हणजे, सिरासचे एकांतात दाखवलेले क्षण.
   
  पाहावा की नाही...
  एकूणच हंसल यांनी एक शानदार सिनेमा तयार केला आहे. जर तुम्ही बॉलिवूडच्या टिपिकल मसाला आणि फाइटींगचे सिनेमांपेक्षा वेगळे काही पाहू इच्छित असाल तर हा सिनेमा तुमच्यासाठी आहे. उत्कृष्ट अभिनय आणि शानदार कथेसाठी सिनेमा पाहिला जाऊ शकतो.  
   

Trending