Home »Reviews »Movie Review» Newton Movie Review

Movie Review: मिश्किल अंदाजात निवडणुकांवर निशाना साधतो राजकुमारचा 'न्यूटन'

दिव्य मराठी वेब टीम | Sep 22, 2017, 12:01 PM IST

रेटिंग3.5/5
कलाकारराजकुमार राव, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अंजली पाटील, रघुवीर यादव
दिग्दर्शकअमित मसूरकर
संगीतनरेन चंदावरकर, बेनेडिक्ट टेलर
निर्मातामनीष मुंद्रा
जॉनरब्लॅक कॉमेडी ड्रामा
दिग्दर्शक अमिक मसूरकर यांनी सुलेमानी कीडा (2013) साली एक चित्रपट बनवला होता. त्या चित्रपटाचे समिक्षकांनी बरेच कौतुक केले होते. आता अमित भारतातील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उठवणारा एक चित्रपट घेऊन आला आहे ज्याचे नाव आहे 'न्यूटन'.
कथा
ही कथा आहे नूतन कुमार (राजकुमार राव) याची. जो दहावी बोर्डाच्या परीक्षेत त्याचे नाव बदलून न्यूटन ठेवतो. त्यानंतर तो फिजिक्समधून M.sc करतो आणि नंतर इलेक्शन बोर्डामध्ये कामाला लागतो. यादरम्यान त्याची ड्युटी छत्तीसगढ येथे जंगली भागात लागते. ही अशी जागा असते जिथे आजपर्यंत वोटींग झालेले नसते. लोकनाथ(रघुवीर यादव) यांच्यासोबत पूर्ण टीम जंगलात जाते. पोलीस आत्मा सिंह(पंकज त्रिपाठी) यांच्या निगराणीत वोटींगचे काम असते. सर्वांना वाटत असते की तिथे वोटींग होणार नाही पण न्यूटनला विश्वास असतो की वोटींग होईल. पण गोष्टी बदलतात आणि एक खास रिपोर्ट समोर येतो. तो काय असतो ते पाहण्यासाठी आपल्याला चित्रपट पाहावा लागेल.
पुढच्या स्लाईडवर पाहा, कसा आहे चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, संगीत..

Next Article

Recommended