आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: रंजक आणि आपल्या आजुबाजुला घडणारी कहानी आहे \'पिंक\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट पिंक
रेटिंग ३.५ स्टार
कलावंत अमिताभ बच्चन, तापसी पन्नू, किर्ती कुलहारी, आंद्रिया तरिंग, अंगद बेदी, रशुल टंडन, तुषार पांडे, विजय वर्मा, धरतीमान चॅटर्जी, पियुष मिश्रा, ममता शंकर, विनोद नागपाल आणि सुधनवा देशपांडे
दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी
संगीत शांतनु मोईत्रा, अनुपम रॉय आणि फैजा मुजाहिद
कथा रितेश शहा
संवाद रितेश शहा
पटकथा रितेश शहा आणि सुजित सरकार
श्रेणी कोर्टरूम ड्रामा

लेटनाईट पार्टी सुरु असल्याच्या पार्श्वभूमीला येणारे आवाज, पडद्यावर चित्रपटाची नावे. नावे संपताच तीन भेदरलेल्या तरुणी रात्रीच्या गडद अंधारात गाडीतून जाताना. तर दुसऱ्या गाडीत चार तरुण. त्यातील एक रक्ताने माखलेला. बाकी तिघे घाबरलेले अन ‘छोडेंगे नही लडकीयोंको’ असा संवाद म्हणत त्याला दवाखान्यात दाखल करतात. अशी रहस्यमय सुरुवात आहे अनिरूद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित ‘पिंक’ चित्रपटाची. नही ये सिर्फ शब्द नही अपने आप मे पुर्ण वाक्य है, अशा गहन संवादातून वेगळेपण सांगणारा हा चित्रपट.
बिग बींची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात आजची तरुणाई, भारतीय मानसिकता आणि मुली यांची सुरेख गुंफण आहे. आजच्या काळात अतिशय समर्पक विषय यामध्ये मांडण्यात आला आहे.तरुण पिढीतील प्रत्येकाने पहावा असा हा चित्रपट आहे. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण आपण फार वेगाने केले पण ते वैचारिक पातळीवर नसुन फक्त दृष्य पातळीवर आहे, याकडे चित्रपटातून लक्ष वेधण्यात आले आहे. दिल्लीतील एका सोसायटीत राहणाऱ्या तीन मुली अन संकटात सापडल्यावर त्यांना मदत करणाऱ्या वकीलाभोवती चित्रपट अतिशय सुरेख पद्धतीने गुंफण्यात आला आहे.
एखाद्या आर्टफिल्मप्रमाणे पुढे सरकणारा हा चित्रपट आहे. साधेपणा आणि वास्तवता यामध्ये लक्ष वेधते. सत्यासाठी ठामपणे हातात हात घालून उभ्या राहणाऱ्या तीन मैत्रिणी यामध्ये आहेत. देशाने महिलांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून बहाल केलेले अधिकार अन सामाजिक चौकट भेदण्याचा अचुक प्रयत्न यात आहे. आजकाल अनेक ठिकाणी घडणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांवर चौफेर चर्चा होतात. पण, थेट निशाणा साधत त्यावर असलेला मार्ग यामध्ये दाखवण्यात आला आहे. त्यामुळे सुजित सिरकार, रितेश शहा आणि अनिरूद्ध चौधरी यांना असा दमदार विषय मांडण्याचे श्रेय द्यावेच लागेल. उत्तमपणे विषय कसा मांडावा याचा वस्तूपाठ यामध्ये पाहता येईल. फक्त चर्चा घडवून आणण्यापेक्षा मार्ग आणि थेट विचार यातून देण्यात आला आहे. मनोरंजनाचा हा विषयच नाही. हा मानसिकतेवर सखोल घाव घालणारा विषय आहे.
बिग बींनी अलीकडील काळात पा, पिकू, तीन, काटे, शामिताभ आणि वजीरसारख्या चित्रपटांतून वैविध्यपुर्ण भूमिका साकारत स्वत:च्या अभिनय क्षमतेच्या वेगळ्या पैलूंचे दर्शन घडवले. ‘पिंक’ देखील आणखी वेगळेपण सांगणारा आहे. उत्तम अभिनय, थेट विचार, चांगले चित्रीकरण ही चित्रपटाची बलस्थान आहेत. अमिताभ यांनी टिव्टरवर नातींना पत्र लिहीले, त्यातही याच चित्रपटातील सार असल्याचे लक्षात येते.
पुढे वाचा, सिनेमाचा उर्वरित रिव्ह्यू...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...