आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेव्हहार्ट - खंबीर हृदयाच्या माणसांची गोष्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 

चित्रपट
ब्रेव्हहार्ट
 
रेटिंग 3/5
कलाकार अरुण नलावडे, अतुल परचुरे, सुलभा देशपांडे, संग्राम समेळ, धनश्री काडगांवकर 
दिग्दर्शक दासबाबू
निर्माता सच्चिदानंद गोपीनाथ कारखानीस, संतोष यशवंत मोकाशी
पटकथा, संवाद श्रीकांत बोजेवार
श्रेणी ड्रामा
 
कितीही संकटे आली तरी काही माणसे अिजबात डगमगत नाहीत. मग ते संकट कुटुंबावर कोसळलेले असो किंवा एखाद्याला असाध्य आजार झालेला असो. आपण मनाने खंबीर असलो तर कोणत्याही आपत्तीचा मुकाबला करु शकतो असे मोठेमोठे विचारवंत सांगून गेले आहेत. मात्र सगळे गाडे अडते ते मन खंबीर करण्याची वेळ येते तेव्हाच. मराठी चित्रपटांत आई व मुलाच्या नात्यावर अनेकदा भाष्य केले गेले आहे. मात्र वडिल व मुलामधील घट्ट नाते व स्नेहाबद्दल खूपच कमी वेळा चित्रपटांतून दाखविले जाते. हीच नेमकी उणीव भरुन काढली आहे ब्रेव्हहार्ट या मराठी चित्रपटाने.

एक दुर्धर आजार झालेला मुलगा व त्या मुलाच्या अखेरीपर्यंत त्याची विलक्षण काळजी घेणारे वडिल असे दोन महत्वाचे पदर ब्रेव्हहार्ट िचत्रपटाच्या कथेला आहेत. वास्तववादी घटनेवरच हा चित्रपट बनविण्यात आला असून चित्रपटात वास्तवातील नावेही जशीच्या तशी ठेवलेली आहेत. त्यामुळे या चित्रपटाबद्दल एक विश्वासार्हता निर्माण होते. वास्तववादी घटनांवर आधारित चित्रपट हा बऱ्याचदा प्रयोगशील किंवा लघुपटाच्या धर्तीवरचा बनण्याचा धोका असतो. परंतु तसे या चित्रपटाचे सुदैवाने झालेले नाही.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, का पाहावा चित्रपट..काय आहे कथानक
 
बातम्या आणखी आहेत...