आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOVIE REVIEW : हमारी अधुरी कहानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटहमारी अधुरी कहानी
रेटिंग*** (3/5)
कलावंतविद्या बालन, इम्रान हाश्मी, राजकुमार यादव
दिग्दर्शकमोहित सुरी
श्रेणीइमोशन ड्रामा
बस्तरच्या जंगलाच आरव अशी भावनिक हाक देत चालणारी वसुधा अचानक खाली कोसळते अन आयुष्याचा शेवटाचा गहिरा श्वास घेते. 75 एमएमच्या भव्य पडद्यांवर दिसतो तो फक्त एक हात आणि ऐकू येतो फक्त जंगलात सळसळणाऱ्या पानांचा आवाज. प्रेम आणि संस्कार यामध्ये होणारा भावनांचा गुंता हा भारतीय समाजाचा धागा पकडलेला "हमारी अधुरी कहाणी' आज प्रदर्शित झाला. नेहमीप्रमाणे व्यक्तिरेखेला साजेसा अभिनय केलेली विद्या प्रेक्षकांना मात्र आपल्या प्रेमात पाडू शकली नाही.
हरी अचानक संसारातून गायब होतो. त्याचा पाठपुरावा करतानाच मुलाला वाढवणारी वसुधा आयुष्याच्या एका सुंदर वळणावर आरवच्या प्रेमात पडते. याभोवती चित्रपट गुंफण्यात आला आहे.
कलियुग, आवारा, आशिकी 2 सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या मोहित सुरीने दिग्दर्शनावरील त्याची पकड पुन्हा एकदा सिद्ध केली. शुगूफ्ता रफिक आणि महेश भट्ट यांनी लिहीलेली सुंदर आणि तितकीच वास्तविक, भावनिक कहाणी चित्रपटातून मांडली गेली. पटकथा अतिशय दमदार आहे. चित्रपटात भारतीय समाज, त्यावर असलेला संस्कारांचा घट्ट पगडा आणि प्रत्येक बंधनाच्या पलिकडे नेणारे प्रेमाचे आफाट खुले जग यामध्ये दाखवण्यात आले. आत्म्यावर फक्त प्रेमाचाच रंग चढतो बाकी सगळी बंधने ही शरीरापर्यंतच मर्यादित आहेत, हे वास्तव चित्रपटातून अचूकरित्या दाखवले आहे. अधूरी वाटणारी ही एक परिपूर्ण कहाणी आहे. दृष्यांना योग्य पद्धतीने पूढे नेणारी गीते, त्याला साजेसे संगीत आहे. चित्रपटातील भव्यपणा नयनसुख देणारा आहे तरीही अनेक कड्या अधूऱ्या राहिल्या असल्याचे जाणवते.
पुुढील स्लाईडमध्ये वाचा, उर्वरित रिव्ह्यू...
बातम्या आणखी आहेत...