आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOVIE REVIEW: मनोरंजनासोबतच प्रेक्षकांना प्रेरणा देणारा \'पिकू\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- अमिताभ बच्चनसोबत दीपिका पदुकोण)
सिनेमाचे नाव पिकू
क्रिटिक रेटिंग 3.5/5
कलाकार अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि इरफान खान
दिग्दर्शक सुजीत सरकार
निर्माता एन.पी.सिंह, रोनी लहरी
संगीत अनुपम रॉय
जॉनर फॅमिली ड्रामा
कथा-
'पिकू' सिनेमाची कहानी वडील-मुलीच्या नात्या आधारित आहे. 'पिकू'मध्ये अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांनी वडील-मुलीची भूमिका साकारली आहे. सिनेमाची कहानी अशी, पिकू अर्थातच दीपिका पदुकोणच्या अवतीभोवती गुंफण्यात आली आहे. तिचे जग तिचे वडील भास्कर बॅनर्जी (अमिताभ बच्चन) आहेत. दोघेही दिल्लीच्या चितरंजन पार्कमध्ये राहतात. पिकू स्वत:चे काम सांभाळून वडीलांची काळजी घेते. भास्कर बॅनर्जी यांना पोटाची समस्या असते आणि याविषयी माहिती नेहमी समोर येते. एक वेळ अशी येते, की पिकूच्या आयुष्यात मालिक राजा चौधरी (इरफान खान)ची एंट्री होते. परंतु परिस्थिती अशी तयार होते, की तिघे दिल्लीहून कोलकात्याला रवाना होतात. सिनेमा आपल्या टॅगलाइन 'मोशन टॅग लाइन', 'मोशन से ही इमोशन' ने प्रेक्षकांना भावनात्मक करतात.
दिग्दर्शन-
'विक्की डोनर' आणि 'मद्रास कॅफे' तयार केल्यानंतर प्रेक्षकांना सुजीत सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. सिनेमाचे संवाद आणि पटकथा प्राभावित करणारे आहेत. सुजीनने पात्रांना खूपच रंजकरित्या कथेत रुजवले आहे. पिकूच्या माध्यमातून सुजीतने एक उत्कृष्ट कहानी प्रेक्षकांच्या समोर मांडली आहे. परंतु सिनेमाची गती थोडी हळूवार आहे. अधून-मधून प्रेक्षकांची उत्सूकता ताणून धरल्यासारखे वाटते. सिनेमाची कहानी जुही चतुर्वेदीने लिहिली आहे.
स्टार्सचा अभिनय-
पिकूमध्ये अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि इरफान खान यांना अभिनया प्रभावी आहे. अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा सिध्दा केले आहे, की त्यांना महानायक का म्हटले जाते. अमिताभ यांनी मुळीच जाणीव करून दिली नाही, की ते वयस्कर आहेत. 70 वर्षांचे भास्कर बॅनर्जीच्या पात्राला जीवंत करण्यासाठी त्यांना कोणतीच कसर सोडली नाही. कधी त्यांचा मस्ती करण्याचा तर कधी वाद घालण्याचा त्यांचा मूड घरातील वयस्कर व्यक्तीची आठवण करून देणारा आहे. दीपिकाने या सिनेमात आपल्या करिअरमधील सर्वाधिक प्रभावी भूमिका साकारली आहे. तिने प्रत्येक सीन जीव लावून केली आहे. आपल्या पात्रातून तिने तरुणाईला प्रेरणा दिली आहे. आपले पालक आपल्यासाठी किती महत्वाचे असतात याची जाणीव तिच्या पात्रातून होते. इरफानच्या अभिनयात एकप्रकारची जादूच आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्याने आपल्या अभिनयाचा शानदार नमूना सादर केला आहे. एक रोमँटिक हिरोच्या रुपातील इरफानचा हा अंदाज तुम्हाला नक्की भावेल. शिवाय डॉक्टरच्या रुपात रघुबीर यादव आणि मौसीच्या पात्रात मौसमी चॅटर्जी यांनीदेखील अभिनयाचा न्याय दिला आहे.
संगीत-
अनुपम रॉय यांच्या संगीताने सजलेला 'पिकू'चे गाणे ऐकण्यासारखे आहे. गाण्याचे बोल नक्कीच तुमच्या मानत घर करतील. सिनेमात एकूण 6 गाणी आहेत.
का पाहावा-
रुपेरी पडद्यावर दिर्घकाळानंतर एक कौटुंबीक सिनेमा आला आहे, जो तुमचे भरभरून मनोरंजन करू शकतो.