आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: \'इत्तेफाक\' सस्पेन्सने भरपूर, अॅक्टिंगमध्ये कमजोर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट इत्तेफाक
रेटिंग 2/5
कलाकार सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हा, अक्षय खन्ना
दिग्दर्शक अभय चोप्रा
कथा श्रेयस जैन आणि निखील मेहेरोत्रा
संगीत तनिष्क बागची
निर्माता शाहरुख खान, गौरी खान, करण जोहर, रेनू रवि चोप्रा आणि हीरू यश जोहर
जॉनर  रहस्यपट
 
‘साईन पोस्ट टू मर्डर’ या 1965 ला प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपटावर ‘इत्तेफाक’ नावाचा चित्रपट बी आर चोप्रा यांनी काढला होता. 1969 मध्ये राजेश खन्ना, बिंदू आणि नंदा यांना घेऊन केलेल्या इत्तेफाकने धूम केली होती. त्याच चित्रपटाचा रिमेक सोनाक्षी सिन्हा आणि सिद्धार्थ मल्होत्रा, अक्षय खन्नाला घेऊन करण्यात आला. मात्र, आजच्या काळातील प्रेक्षकांना हा रहस्यपट प्रत्येकक्षणी खिळवून ठेवणारा नाही. 

चित्रपटातील शेवटीची 30 मिनीटे कहाणी अतिशय रंजक होत जाते. विद्या बालनचा कहानी किंवा अजय देवगणचा दृष्यम चित्रपटाप्रमाणे याचाही क्लायमेक्स एकदम अचंबित करणारा आहे. असे असले तरीही सुरुवातीच्या दिड तासात प्रेक्षकांना गूंतवून ठेवणे यामध्ये जमलेले नाही. एका खूनापासून चित्रपटाची सुरुवात होते. त्या खूनाचा काहीही अंदाज येण्यापुर्वीच दुसरा खूनही होतो. पोलिसांपूढे मोठे आव्हान उभे राहते. चित्रपटाची कथा उत्तमपणे बांधली आहे. पटकथेत आजचे संदर्भ, पोलिसांची आजची स्थिती चांगली मांडली आहे. पण, अनेक गोष्टी फिल्मीच वाटतात. अक्षय खन्ना आणि सिद्धार्थने चांगला अभिनय करून चित्रपटाला वाचवले असे म्हणता येईल. आजच्या काळातील प्रेक्षकांना पहिल्या क्षणापासून खिळवून ठेवण्यावर लक्ष देणे गरजेचे होते. रहस्यपटात शेवटची 30 मिनीटे खूप महत्त्वाची ठरतात. पण, खून किंवा चोरी घडते तेव्हापासून प्रेक्षक या सर्वांमध्ये गुंतून नेमके हे कुणी केले असावे याचा मनोमन शोध करत असतात. तसे या चित्रपटात होत नाही. प्रेक्षक अतिशय कष्टाने शेवट जाणण्यासाठी बसून आहेत असा याचा अनुभव आहे. सोनाक्षी सिन्हाने अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. अक्षय खन्नाने नायक म्हणून नशीब आजमावले आहे. मात्र, या चित्रपटातील पोलिसाच्या भूमिकेप्रमाणे इतर भूमिका तो अधिक लक्षवेधी करु शकतो. 
 
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, काय आहे कथा.. 
बातम्या आणखी आहेत...