आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOVIE REVIEW : एबीसीडी 2

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपटएबीसीडी 2
रेटिंग** (2/5)
कलावंतश्रद्धा कपूर, वरूण धवन, प्रभु देवा
दिग्दर्शकरेमो डिसूझा
श्रेणीड्रामा

नृत्याच्या अफाट जगाची सफर घडवणारा रेमो डिसुझाचा 'एबीसीडी 2' आज प्रदर्शित झाला. तरुणाईचे आकर्षण असलेले श्रद्धा कपूर, वरूण धवन यांच्यासह डान्सचा किंग प्रभुदेवा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट. स्पर्धा आणि पॅशन यांचे समीकरण एकत्र मांडणाऱ्या या चित्रपटाला 'जो जिता वही सिंकदर' किंवा 'चक दे इंडिया'सारखी जादू करता आली नाही.
सालसा, हिप हॉप, कंटेंप्ररी आणि फ्यूजन अशा जगभरातील विविध नाविन्यपूर्ण नृत्यशैलींची सफर घडवणारा हा चित्रपट आहे. मात्र, प्रेक्षकांच्या मनात घर करेल अशी किमया यात नाही. 'एबीसीडी'पेक्षा यामध्ये एक पाऊल पूढे टाकण्यात रेमोला यश आले आहे हे मात्र नक्की. भारतातील रिअॅलिटी शोमध्ये कॉपी केल्याबद्दल सर्वत्र टिकेची झोड उठलेला संघ लास वेगासमधील जागतिक स्पर्धेला कसा सामोरा जातो याभोवती ही कथा गुंफली आहे. मात्र, 'जो जिता...' किंवा 'चक दे...' सारखी मजा यामध्ये नाही. चित्रपटातील नृत्याविषयीचे पॅशन, प्रेमकहाणी, मैत्री अशा भावनांची खोली दिग्दर्शकाला प्रेक्षकांपर्यंत पोहचवता आली नाही. त्यामुळे जीव नसल्यासारखी ही कहाणी पूढे सरकताना दिसते. नृत्याभोवती चित्रपट असला तरीही लक्षात राहिल अशी गाणी यामध्ये नाहीत.
तरूणाईचे चित्रपट म्हटले 'जो जिता वही सिकंदर' आजही आठवतो, उत्कंठा शिगेला नेईल असे एकही दृष्य एबीसीडी मध्ये नाही. असे असले तरीही नृत्याची प्रत्येक फ्रेम दाद मिळवून जाणारी होती. 'हॅपी न्यू इअर' हा फराहाचा चित्रपट आणि 'एबीसीडी' यामध्ये अनेक ठिकाणी साम्य जाणवते. चित्रपटाची पटकथा तुटक वाटते. प्रेक्षकांना भावनिकरित्या बांधून ठेवण्याचे कौशल्य दिग्दर्शकाला उमगले नाही. असे असले तरीही चित्रपटातील सर्वच बॉलिवूड डान्सर्सनी उत्तम काम केले.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, कसा आहे कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन आणि संगीत..
बातम्या आणखी आहेत...